नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुदैवी ठसाळे यांनी घेतली माजी मंत्री रामदासभाई कदम यांची भेट लोटे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना सर्वांगीण विकास देणार : सुदैवी ठसाळे

84

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम,आमदार योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लोटे ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया लोटे ग्रामपंचायात निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्य सुदैवी समीर ठसाळे यांनी येथे बोलतांना व्यक्त केली,
लोटे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी नुकतीच रामदासभाई कदम यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले,ग्रामपंचायत मधील विकास कामासाठी आपले सदैव सहकार्य राहील असे आश्वासन या वेळी रामदासभाई कदम यांनी सर्व सदस्यांना दिले,लोटे विभाग प्रमुख महेश गोवळकर,उपसरपंच सुरेश ठसाळे ,दीपक आब्रे ,समीर ठसाळे,चंद्रकांत चाळके,सचिन काते, नितीन चाळके,समीक्षा जोईल,जानवी शिंदे,शितल ठसाळे,निलिमा चाळके,मनोहर कासेकर, संकेत चाळके आदी मान्यवर उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*