रस्ता सुरक्षा अभियानाची अकोट मध्ये सुरुवात

84

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

गेल्या कित्येक वर्षा पासुन पोलीस स्टेशन, अकोट, जेसीआय अकोट, रोटरी क्लब व शेतकरी मोटर्स यांच्या संयुक्त् विदयमाने रस्ता सुरक्षा सत्पाह अभियान साजरा केला. जात असतो त्या अंतर्गत हया वर्षी स्थानिक अकोट शहरातील सरस्वती विध्यालयामध्ये रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला हया वेळी मंचावर सरस्वती विदयालयाचे मुख्याध्यापक ठाकुर सर, उपमुख्याध्यापक सौ. धर्मे मॅडम ,राेटरी चे माजी अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार,जेसीआय अध्यक्ष नितीनजी शेगोकार, उपाध्यक्ष निेलेश इंगळे ,सचिव सागर बोरोडे ,प्रकल्प् प्रमुख अभिषेक दुबे व हिरो कंपनीचे टेरीटरी सर्व्हीस मॅनेजर नागेंद्र्सर उपस्थित होते.
सर्व प्रथम नंदकिशोर शेगोकार यांनी रस्ता सुरक्षा अभियाना बद्दल माहीती दिली त्यासोबतच सुरक्षित चालकाकरीता 3 गोष्टी आवश्यक आहे त्यामध्ये स्किल- कला- प्रत्येक वाहन चालकाने सर्वप्रथम वाहन चालवण्याची कला व त्या वाहनाबद्दल संपुर्ण माहीती अवगत असली पाहीजे, दुसरी गोष्ट् म्हणजे वाहतुकीचे नियमाचे संपुर्ण माहीती असली पाहीजे त्यामध्ये वाहन नेहमी डाव्याबाजुने चालवणे, हेलमेट , सिटबेल्ट् इत्यादीची माहीती ही असली पाहीजे.त्यासोबतच रोड रोड साईन बद्दल विस्तृत पणे सर्वांना माहीती देण्यात आली त्या सोबत सुरक्षित चालकाचा ॲटीटयुड-वृत्ती- प्रत्येक वाहन चालकाने नेहमी शांत मनाने त्यांची गाडी चालवली पाहीजे.त्यासोबतच होणा-या अपघाता मध्ये किती निरागस लोकांचे प्राण गमावावे लागतात त्याची गांभिरता असते असे त्यांनी संपुर्ण विश्लेषणा सह उपस्थितांना सांगीतले.
त्यानंतर नागेंद्र् सर यांनी BS6 वाहनांन मध्ये कोणकोणते बदल कंपनिंनी केलेले आहेत त्याबद्दल सविस्त्र माहीती उपस्थीतांना दिली त्यासोबतच त्यांनी गाडीवर कशाप्रकारे बसायला पाहीजे, हेलमेट कसे असायला पाहीजे ,कसे घालायला पाहीजे त्याबद्दल त्यांनी माहीती दिली.शेतकरी मोटसचे सेफ्टी् सुपर वाईजर अजिंक्य तेलगोटे यांनी बंपी ट्रकवर, नॅरो ट्रक वर तथा झिगझॉग रोड वर कशा प्रकारे गाडी चालवायला हवी हया बद्दल प्रात्याशिक करुन दाखविले त्यासोबत गाडी चालविण्या अगोदर आपण कोण कोणते चेक अप करायला पाहीजे त्याबद्दल सवीस्त्र माहीती देण्यात आली. सरते शेवटी विदयार्थ्यांना रस्ता सुरक्षा हया विषयावर विदयार्थ्यांची परिक्षा घेण्यात आली तसेच त्यांना रस्ता सुरक्षतेची शपथ उपस्थीतांना देण्यात आली २५ जानेवारीला फक्त वाहनचालकांसाठी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन अकोट राेटरी नेत्र रुग्णालय येथे करण्यात आलेले आहे. त्यासोबतच अपघात विमा पॉलिसी बद्दल मोठी जनजागृती करण्यात येणार आहे तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता कृष्णाजी नाथे , अजिंक्य नाथे, सरस्वती विदयालाचे शिक्षक वृंद रुपेश डांगरे, कल्पेश गुलाहे व अकोट पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल नागे साहेब हयांनी मोलाचे परिश्रम घेतले. अशि माहीती जेसीआयचे जनसंपर्क अधिकारी अमित ठाकुर कळवितात.