कोंढवे धावडे येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात पार पडली

118

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
तमाम शिवसैनिकांचे दैवत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त कोंढवे धावडे भागात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील संपर्क कार्यालयात या विभागाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर व मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांचे शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, जिल्हापरिषद सदस्या अनिताताई इंगळे, नितीन वाघ, संतोष शेलार, सौरभ मोकाशी, शिवाजी शिर्के, अमोल गुंजाळ, अभिषेक मोकाशी, शंकर मोकाशी, अमोल धावडे, गणेश मोकाशी, उमेश सरपाटील, अभिजित धावडे, रमेश धावडे, वैभव बिडकर हे उपस्थित होते. तसेच कोंढवे धावडे ग्रामपंचायत कार्यालयात देखील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शासकीय पूजा करण्यात आली. कोंढवे-धावडे गावचे सरपंच नितीन धावडे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. उपसरपंच विक्रम धोंडगे,उमेश सरपाटील, अभिजीत धावडे,शिवसैनिक संतोष शेलार, अतुलआप्पा धावडे, शिवसैनिक अविनाश सरोदे, ,सुमित लिंबोरे, निखिल धावडे, सागर मोरे, शिवव्याख्याते बिभीषण मोरे, अमोल धावडे, संदीप खराडे, अविनाश मोकाशी, ग्रामपंचायतीचा पूर्ण कर्मचारी वर्ग आणि कोंढवे-धावडे ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.