अकोटः एसटी महामंडळाला अल्टीमेंटमः प्रहारचे निवेदन विद्यार्थीसाठी ग्रामीण भागातील नियमित बस सेवा सुरु करा

83

 

अकोट ता. प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

अकोट तालुका ग्रामीण भागातील नियमित बस सेवा सुरु करण्यात यावी,अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
प्रहार जनशक्ति पक्ष कार्यकर्तानी दिला.
अकोट विभागीय नियंत्रक
म.रा.परिवहन मंडळ याना दिलेल्या निवेदनात मार्च 2020 पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे अकोट तालुका ग्रामीण भागातील बस सेवा बंद करण्यात आल्या होत्या. परंतु 9 ते 12 पर्यंत च्या शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या आहेत. सर्वच शाळेत अध्यापनाचे कार्य चालू आहे. मात्र अकोट तालुका ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु ग्रामीण भागातील बस सेवा सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. खाजगी वाहनधारक विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी केली आहे..
लवकरात लवकर बससेवा सुरु केली नाही तर
प्रहार जनशक्ति पक्ष आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सदर निवेदन विशाल भगत अचल बेलसरे बजरंग मिसळे विजय लिल्हारे विशाल निचळ जीनेश फुरसुले रितेश हाडोळे तुषार गये अतुल दाफे ऋषि लिल्हारे अनिकेत फुरसुले तुषार वाघमारे लावण्य मिसळे यांचेसह कार्यकर्तीनी दिले.