जिल्हा परिषद शाळा कोंढाळा येथे बालभवणाच्या इमारतीचे उद्घाटन

173

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते पाचवीच्या विध्यार्थ्यांसाठी फुलोरा बालभवणाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीर्वाद यांच्या संकल्पनेतुन इयत्ता पहिली ते पाचवीच्या विध्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमतांचे विकसन व्हावे या उद्देशाने फुलोरा बालभवन उपक्रम साकारण्यात आले.याच उपक्रमाच्या माध्यमातून लहान मुले-मुली यांची शाळेत येण्याची गळती कमी होण्यासही मदत होणार आहे.
इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी गटशिक्षणाधिकारी डॉ.कोडपे,कुरुड केंद्राचे केंद्रप्रमुख बन्सोड,कोंढाळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयानंद बुराडे,राजेंद्र शेंडे,हिवताबाई मेश्राम,रोहिणी ठाकरे,भिमाबाई ठवरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका निरुपारा देशपांडे, संतोष टेंभुरणे,योगेश ढोरे,सुनील निंबार्ते,सुरेश आदे,रेखा चौधरी,माधुरी रामगुंडे,रजनी जांभूळकर व आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.