ग्रेडरने नाकारलेल्या शेतकऱ्याच्या कापसाची अखेर खरेदी.. — सखाराम बोबडे यांच्या पाठपुराव्याला यश..

144

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चांगला नसल्याचे कारण सांगून ग्रेडरने नाकारलेल्या कापसाची अखेर त्याच ग्रेडर ला त्याच जिनिंगवर खरेदी करावी लागली. धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला शुक्रवारी सायंकाळी उशिरा यश आले.

गंगाखेड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शेतकरी शिवराज चिलगर या शेतकऱ्यांचा कापूस खरेदीसाठी पालम रोड वरील केशव जिनिंग येथे नेण्यात आला होता .केंद्र प्रमुख कदम यांनी सदर शेतकऱ्याचा कापूस चांगला नसल्याचे सांगत अर्धा कापूस खाली केलेली गाडी भरून परत घेऊन जा असे सुनावले होते .अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांने परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याशी संपर्क साधत तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची भेट घेऊन लेखी निवेदन देण्यात आले होते. तहसीलदार यांनी संबंधिताला योग्य ती कार्यवाही करण्याची आदेश देऊनही ग्रेडर कदम यांचा तोरा मात्र कमी होत नव्हता. सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी शेवटी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक रेणके यांच्याशी संपर्क साधून सर्व हकिगत त्यांना सांगितली . जिल्हाधिकार्‍यांनाही एसएमएस द्वारे ही माहिती कळवण्यात आली होती शेवटी सखाराम बोबडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला उशिरा यश झाले. शुक्रवारी सायंकाळी उशिरा या शेतकऱ्यांचा कापूस कदम यांनी खरेदी केला. या कापसाचे वजन 25 क्‍विंटल भरले.