रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता…… मंगरूळपीर ते मानोली रस्ता ठरतो अपघाताला निमंत्रण रस्ता त्वरीत दुरुस्त करावा,सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत व प्रमोद भगत यांची मागणी

143

 

मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर ते मानोली रस्त्यात खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते या रस्त्यावर दररोज वाहन चालकांचे अपघात होत आहे सुदैवाने जीवितहानी झाली नाही हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत व प्रमोद भगत तसेच नागरिकांनी केली आहे अन्यथा तिव्र आंदोलन करन्याचा इशाराही प्रशासनाला दिला आहे.
गेल्या दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे डागडुजी,खडीकरण व डांबरीकरण याचे काम झाले या रस्त्यावर शासनाने लाखो रुपये खर्च केला परंतु हा रस्ता निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने दोन वर्षातच या रस्त्याची वाट लागली या रस्त्याचे काम ठेकेदारामार्फत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने आज रोजी हा रस्ता शेवटच्या घटका मोजत आहे हा रस्ता मंगरूळपीर ते शेलगाव चिंचाळा गोलवाडी मानोली सायखेडा रोडवर असून या रस्त्यावर इत्यादी गावे लागतात तालुक्यात हा रस्ता सदैव वर्दळीचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहन चालत आहेत या गावातील वाहन चालविणाऱ्या नागरिकांना हा रस्ता मोठा धोकादायक ठरत आहे शासन अपघात टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करतात परंतु या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने हा रस्ता ‘आभाळ फाटलं त्याला ठिगळ कुठे लावणार’? असा झाला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने दुचाकीवाल्यांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.रात्रीचे वेळी या रस्त्यावर येणारी नवीन वाहने काही ठिकाणी रस्ता चांगला असल्याने वाहन जोरात हाणतात परंतु त्यांना माहीत नसते की या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे तेव्हा त्यांचा अनेक वेळा अपघात झालेला आहे.या रस्त्यावर खड्डे तर पडलीच आहे परंतु त्या खड्ड्यामध्ये बारीक गिट्टी जमा झाली असल्याने समोरून वाहन आल्यानंतर त्या वाहन चालकांना खड्ड्यातून वाहन घालवावी लागते तेव्हा गाडी स्लिप होऊन अनेक वेळा अपघात झालेले आहेत परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही ही महत्त्वाची बाब आहे. दोन वर्षापूर्वी हा रस्ता बनला आहे परंतु आज रोजी हा रस्ता शेवटच्या घटका मोजत आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत आणी प्रमोद भगत यांनी केली असुन परिसरातील गावातील नागरिकही आता रस्तादुरुस्तीसाठी आक्रमक झाले आहेत.त्वरीत रस्ता दुरुस्त करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करन्याचा इशाराही प्रशासनाला दिला आहे.