नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी….. प्रतिमेला माल्यार्पण करून आमदार जोरगेवार यांनी आदरांजली अर्पण केली.

66

 

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही बंगाली कँम्प चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्य श्री श्री माँ दुर्गा काली माता मंदिर समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान चौकातील सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आमदार जोरगेवार यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजित शहा, तुषार शोम, यंग चांदा ब्रिगेडचे, नितीन शहा, रमेश सरकार, बलराम शहा, गोपी मित्रा, प्राणनाथ राजवर्षी, जे. के. राजवंशी, कमलेश दास, निताई घोष, आशिक हुसैन, पियुष मंडल, डॉ. विधान बिश्वास, अमोल हलदर, प्रदीप शहा, बलराम शहा, यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
“तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा” असा आझादीचा नारा लावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार जोरगेवार पुढे बोलताना म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांना देशातून पळवून लावण्यात त्यांची महत्वाची कामगिरी होती इतकेच नव्हे तर आजही त्यांनी दिलेल्या “तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा” या नेताजींच्या घोषणेमुळे अनेक तरुण स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले होते. आजही शब्दांमुळे मनात देशभक्तीची तीव्र भावना जागृत होते.