चिमुकलीने वाढ दिवसाच्या खर्चाची रक्कम दिली कोरोना निधीला.

137

 

श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी पवन कोंडे 7350807327 )

माहूर येथील श्री रेणुकादेवी महाविद्यालयात कार्यरत असलेले हनुमंत इबीतदार यांची कन्या संतोषी हिने आपल्या वाढ दिवसा करीता खर्च केली जाणारी एक हजार रुपयाची रक्कम दि.23 जुलै रोजी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांचे माध्यमांतून कोरोना निधीला दान दिली आहे.
इयत्ता चौथ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या संतोषी हिचा वाढ दिवस दरवर्षी मोठया थाटात साजरा केल्या जातो. यावर्षी मात्र कोरोनाच्या महामारीने अख्ख जग हैराण असताना आपण वाढ दिवस साजरा करावा ही बाब तिच्या बाल मनाला रुचली नाही.त्या करीता खर्च केली जाणारी एक हजार रुपयाची रक्कम कोरोना निधीला दान देण्याचा मनोदय तीने आपल्या आईला सांगितला.सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संगीता इबीतदार यांनी लागलीच होकार दिला.
बाल वयात संतोषीने सामाजिक भान बाळगून दाखविलेल्या उदार मनाचे संतोष चव्हाण, यशवंत वाघमारे, नगरसेवक इलियास बावाणी,गजानन संगेवार, देवानंद भांडवले,अमित आडे,प्रणिता जोशी,बंडू ईश्वरकर,अनिल माडपेल्लीवार, सुरेश पवार यांचेसह संस्थेच्या मान्यवरांनी तिचे कौतूक केले आहे.