वरुर येथे श्रीराम मंदिर निर्माण व गृह संपर्क अभियान अंतर्गत कार्यक्रम

77

 

अकोट ता. प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

अकोट तालुक्यातील वरुर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्री राम मंदिर गृह संपर्क अभियान कार्यक्रम पार पडला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ह. भ. प. श्री वासुदेव महाराज खोले गुरुजी,ह. भ.प. श्री श्रीधर महाराज पातोंड,ह. भ. प .श्री ज्ञानेश्वर महाराज पातोंड,ह.भ. प. श्री सोपान महाराज ऊकर्डे ,ह. भ. प.श्री विक्रम महाराज शेटे यांची उपस्थिती लाभली व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ह-भ-प श्री गणेश महाराज शेटे उपस्थित होते.त्यांनी उपस्थित गावकरी मंडळीला अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माण च्या अनुषंगाने गृह संपर्क अभियान कशा पद्धतीने राबविल्या जात आहे. ही परिपूर्ण माहिती दिली व गावा मधून श्रीराम भक्तांचा भरपूर प्रतिसाद मिळाला त्यावेळेला गावातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभली वरुर येथे निधी संकलन यायोजन हरीभाऊ आवारे,चेतन डोयफोडे, देविदास निकम यांच्या कडे दिले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चेतनभाछ डोयफोळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन मनीष ब्राम्हनकर व विठ्ठल वाकोळे, सुरेश घुघे यांनी केलेले.