वाघधरेवाडी येथे दुचाकी ला अवैध रेती च्या ट्रक ची धडक अपघातातील जख्मी सुबोध बोरकर चा उपचारा दरम्यान मुत्यु

227

.

पारा शिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत नागपुर

कन्हान(ता प्र) : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील वाघोली खाजगी कंम्पनीतुन कामकरून दुचाकी ने घरी परत जाताना तारसा रोड पुलाजवळ अज्ञात अवेध रेती च्या ट्रक चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने दुचाकी ला धडल मारल्याने दोन्ही खाली पडुन जख्मी झाल्याने मागे स्वार सु़बोध राजश बोरकर यांचा मेयो रूग्णाल य नागपुर येथे उपचारा दरम्यान मुत्यु झाला.
शनिवार (दि.१६) ला फिर्यादी मनोहर पंढरी कावळे वय ४८ वर्ष रा हनुमान मंदीर जवळ तारसा ता मौदा हे मोटार सायकल क्र एमएच ४० ए एस ४७५४ दुचाकीने सोबत काम करणारा सुबोध राजेश बोरकर वय १८ वर्ष रा वाघधरेवाडी कन्हान हे दोघेही नागपुर जब लपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील वाघोली गावा जवळील खाजगी कंम्पनीतुन कामकरून घरी जात असताना रात्री ९ वाजता दरम्यान तारसा रोड पुला जवळ अवैधरेती चोरी करणारेअज्ञात ट्रक चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन पाठीमागुन दुचाकीला जोरदार धडक मारून पसार झाला. दुचाकीसह दोघेही खाली पडुन जख्मी झाल्याने फिर्यादीच्या उजव्या खां द्याला, डाव्या पायाच्या गुडघ्याला जख्म झाल्याने खाजगी रूग्णालयात दाखल केले. सुबोध राजेश बोरकरच्या नातेवाईकाने शासकीय मेयो रूग्णालय नागपुर येथे उपचारार्थ दाखल केले असता (दि.१७) ला उपचारा दरम्यान सुबोध राजेश बोरकर चा मुत्यु झाल्याचे फिर्यीदी ला माहीत झाले. कन्हान पोलीसांनी फिर्यादी उपचाराच्या कागद पत्रावरून व मृतक सुबोध राजेश बोरकर यांच्या मेयो रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या अहवाला वरून अवैध रेती चोरून नेणारे अज्ञात ट्रक चालका विरूध्द कलम २७९, ३३७, ३०४(अ) भादंवि सह कलम १८४ मो वा का अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.