पिंपरी बुद्रुक तालुका इंदापुर ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी संतोष हरिभाऊ सुतार यांची निवड झाल्याबद्दल सत्कार घेत असताना.

0
279

 

नीरा नरसिंगपूर दिनांक- 24 प्रतिनिधी :–बाळासाहेब सुतार,

नुकत्याच झालेल्या 2021 या ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये कैलास वासी बाबुराव सुतार यांचे नातू व माजी सरपंच हरिभाऊ बाबुराव सुतार यांचे पुत्र संतोष सुतार यांची ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुक मध्ये सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल अनेक ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारीत असताना संतोष सुतार म्हणाले की लोकनेते महादेवराव बोडके दादांचा आशीर्वाद पाठीशी ठेवून पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील तळागाळातील गोरगरिबांची कामे करीत राहील अनेक समाजासाठी आलेल्या अडचणी व  समाजासाठी समाज मंदिर

अडीअडचणीचे कामे व पिण्याच्या पाण्याची सोय असे अनेक प्रकारचे सहकार्य माझ्या हातून केले जाईल.

मला जी मतदार बंधू-भगिनींनी मतदान रुपी  निवडून देऊन आशीर्वाद दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करीत आहे.

—————————————————-

फोटो:- ओळी- पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायती मध्ये सदस्य म्हणून विजय विजय झाल्यानंतर सत्कार स्वीकारीत असताना संतोष सुतार.