गोंदिया अंतर्गत अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात गुंतलेल्या गर्भ श्रीमंत मुलांना वाचविण्यासाठी पोलिसांची धडपड तर नाही ना?.. — बसपा प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने यांचे प्रकरणाकडे जातीने लक्ष.. — प्रकरण गंभीर वळणावर…

982

 

संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
वर्ग शिकवणीला गेलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे गोंदिया येथील पुणाटोली परिसरातून अपहरण करणे,अपहरण केल्यानंतर लैंगिक अत्याचार करणे,लैंगिक अत्याचार केल्यानंतर घातपातातंर्गत अपघात करणे,हा गंभीर अपराध असून,अशा गंभीर अपराधातंर्गत स्वत:च्या मुलांना वाचविण्यासाठी गर्भ श्रीमंत लोक सर्थीचे प्रयत्न करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पिडित भोयर परिवाराने उजागर केला असल्यामुळे,ठाणेदार प्रमोद घुगे यांच्या तपास कार्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे प्रश्र्नचिन्ह निर्माण होताना आता दिसत आहेत.तसेच ठाणेदार प्रमोद घुगे हे वादाच्या भोवऱ्यात लटकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

तद्वतच पिडीत भोयर परिवाराने ठाणेदार प्रमोद घुगे यांच्या कार्यपद्धतीवर विविध प्रकारच्या मुद्देसुद शंका व्यक्त केल्या असल्याने,ठाणेदार प्रदीप घुगे हे गर्भ श्रीमंत आरोपींना वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत काय? या प्रश्नातंर्गत सुध्दा महाराष्ट्र शासनाने लक्ष केंद्रित करावे असा सुर महाराष्ट्र राज्यातील जनतेत वेगाने उमटू लागला आहे.या सुरांचे पडसाद अख्या महाराष्ट्र राज्यात पडणार असल्याचे दिसते आहे.

मृतक अल्पवयीन मुलीचे पिडित पालक दुर्वास भोयर यांची लेखी तक्रार घेण्यास ठाणेदार प्रमोद घुगे यांनी,”दिलेल्या नकारा मागचे,नेमके कारण काय? हा प्रश्न आता महाराष्ट्र राज्यातील जनतेत चर्चेचा विषय गंभीररित्या बनलेला आहे.

ठाणेदार प्रमोद घुगेंच्या कार्यपद्धतीवर पिडित कुटुंबिय कमालीचे नाराज असून,सदर ठाणेदांनी पिडित परिवारातील सदस्यांना,”आपल्या बेजबाबदार कार्यप्रणाली नुसार,”परत,पिडित-दु:खी,अत्याचारग्रस्त व अन्यायग्रस्त करण्याचे ठरविले असल्याचे पिडित परिवाराचे म्हणणे दुर्लक्षित करण्यासारखे नाही.

तद्वतच महाराष्ट्र राज्याचे बसपा प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने यांचे गोंदिया लैंगिक प्रकरणाकडे गंभीरपणे लक्ष असून,ते गोंदिया येथील प्रकरणाचे वास्तव्य अती लवकर प्रत्यक्ष जाणून घेणार आहेत व सदर लैंगिक अत्याचाराचे आणि घातपातातंर्गत मृत्यूचे प्रकरण ते कायदेशीर रित्या महाराष्ट्र राज्यात आंदोलनाद्वारे रेटून धरणार असल्याचे मत त्यांनी,”दखल न्युज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधताना,व्यक्त केले.

अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामुहिक लैंगिक अत्याचाराचे प्रकरण व सामुहिक घातपातातंर्गत तिच्या अपघात मृत्यूचे प्रकरण,महाराष्ट्र राज्यात गंभीर वळण घेणार असल्याची चिन्हे मात्र दिसू लागली आहेत.याचबरोबर बसपा हा राष्ट्रीय स्तरावरील तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे,गोंदिया लैंगिक अत्याचार प्रकरणाची भयानकता देशात गुंजू शकते.

परंतू प्रश्न हा पडतो की,प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकारी भेदभाव पुर्ण कार्य का म्हणून करतात? व भेदभाव पुर्ण कर्तव्य का म्हणून पार पाडतात? आणि अशा अधिकाऱ्यांना शेवेतून बडतर्फ शासन का म्हणून करीत नाही?…