सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांची जनहित याचिका दाखल.

 

सुरेंद्र तंतरपाळे प्रतिनिधी

सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांची मा उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपुर येथे मुदत संपलेल्या ग्रामपंचायत वर प्रशासक नेमणूकीची विरूध्द जनहीत याचिकेवर आज नागपुर खंडपीठात न्याय. शुक्रे व न्याय. सुर्यवंशी यांचे समोर सुनावणी झाली असुन प्रशासक नेमणूकीचे विरुद्ध खंडपीठात औरंगाबाद व नागपुर खंडपीठात ज्याही याचिका दाखल झालेल्या आहेत त्यांची एकत्रीत सुनावणी सोमवार पासुन मुंबई उच्च न्यायालयात होणार असुन ग्रामविकास विभागाचे सचिव,निवडणुक आयोग,यांना नोटीस काढण्यात आलेल्या आहे
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे वतीने अॅडव्होकेट संदिप नंदेश्वर व अॅड निहालसिंग राठोड यांनी काम पाहीले तर सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील, राज्य संपर्क प्रमुख राहुल उके,सोशल मिडीया राज्य प्रमुख भाऊसाहेब कळसकर व नागपुर विभागीय अध्यक्ष जितेंद्र गोंडाणे हे हजर होते….

पुरुषोत्तम घोगरे पाटील
संस्थापक राज्याध्यक्ष
भाऊसाहेब कळसकर
सोशल मिडीया राज्य प्रमुख
राहुल उके
राज्य संपर्क प्रमुख
जितेंद्र गोंडाणे
नागपूर विभागीय अध्यक्ष