धक्कादायक किती……वाईट कृत्य हो! सख्या आईने मुलाचे केले लैगिंक शोषण ,महिलेला अटक

570

 

हर्ष साखरे दखल न्यूज भारत

केरळ : आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना केरळमध्ये घडली आहे. लहान मुलाचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच्या आईला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. जन्मदातीवरच हे गंभीर आरोप लागल्याने न्यायालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. केरळ उच्च न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळ आणि गंभीर स्वरुपाचं असल्याचं म्हणटलं आहे. केरळच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवावा असे निर्देश दिले आहेत. याशिवाय विशेष तपास पथक बनवून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असेही सांगितले आहे. केरळमधील तिरूअनंतपुरम जिल्ह्यातील कडक्कावूर इथे राहणाऱ्या महिलेवर तिच्या लहान मुलाचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. 28 डिसेंबरला या महिलेला अटक करण्यात आली होती. यानंतर मुलाला त्याच्या वडिलांकडे दुबईतील शारजाह इथे पाठवण्यात आलं होतं. मुलाचे वडील हे दुसऱ्या महिलेसोबत राहात असून त्यांनी मुलाचं म्हणणं ऐकल्यानंतर पोलिसांत मुलाच्या आईविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणातील आरोपी महिलेने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की एकादं मूल त्याच्या आईवर इतका गंभीर आरोप लावत असेल तर त्या प्रकरणाची गुन्हा दाखल करून सखोल चौकशी गरजेची आहे. जर तपास करणाऱ्या पथकाला बालकाच्या सुरक्षिततेसाठी त्याला वडिलांपासून वेगळं ठेवावं असं वाटत असेल तर त्याला बाल कल्याण समितीद्वारे संचालित केंद्रामध्ये ठेवता येऊ शकतं असंही न्यायालयाने सांगितलं आहे. न्यायालयाने आरोपी महिलेला जामीन मंजूर केला मात्र या घटनेने मातृत्वाच्या पवित्र संकल्पनेला डाग लागल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. आपल्या मुलाला आई ९ महिने पोटात ठेवते त्यामुळे मूल जन्माला येण्याच्या आधीपासून आईचे त्याच्या मुलासोबत संबंध निर्माण झालेले असतात. आईच्या निस्वार्थ प्रेमाची, आपलेपणाची इतर कोणत्याही प्रेमाशी तुलना करता येणार नाही.