ग्राम पंचायत वाकर्ला येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत नाला खोलीकरण कामाला सुरुवात

उपसभापती रोशनभाऊ ढोक यांचे हस्ते कामाचे भूमिपूजन संपन्न

72

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

ग्राम पंचायत वाकर्ला यांचेकडून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बाबाजी माळवे ते परसरामजी माळवे यांचे शेतापर्यंत नाला खोलीकरनाचे काम सुरू केले आहे गावांतील मजुरांना रोजगार प्राप्त होऊन विकास व्हावा यासाठी ग्राम पंचायत चे माजी प्रभारी सरपंच श्री दिनकरजी सिनगारे नेहमी प्रयत्नात असतात त्यांचे विकास कामे लक्षात घेता यावर्षी सुद्धा जनतेनी त्यांना दुसऱ्यांदा निवडून दिलें आहे.

या कामाचे भूमिपूजन पंचायत समिती चिमूर चे उपसभापती श्री रोशनभाऊ ढोक यांचे शुभहस्ते संपन्न झाले यावेळी उपस्थित मजुरांना रोशन ढोक यांनी मौलिक मार्गर्शन केले. या वेळी प.स.चिमूर सभापती रोशनभाऊ ढोक,माजी सरपंच तथा नवनिर्वाचित सदस्य श्री दिनकरजी सिनगारे, अविनाश भाऊ माळवे, सौ.आशा रामचंद्र सिनगारे,सौ.मुक्ता मेघशाम मेश्राम, सौ.लक्ष्मी अमोल तुमराम, रोजगार सेवक श्री कैलास खोब्रागडे, श्री सुनील पाटील,मारोती गजभे, सलीम शेख तथा मजूर उपस्थित होते.