जिल्हा क्रीडा संकुलासाठी आ. सुलभाताई खोडके यांनी शासनाकडून मंजूर केला ८ कोटींचा निधी

विद्यापीठ समीपस्थ शासकीय जागेवर साकारणार मल्टीपर्पज स्पोर्ट हबविविध क्रीडा स्पर्धांचे प्रशिक्षण व स्पर्धा होणार एकाच दालनात

124

 

अमरावती (जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)

खेळातून सामाजिक सदभावना जोपासल्या जात असून सुदृढ आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीसाठी सुद्धा खेळाचे विशेष महत्व आहे . त्यामुळे शासनाच्या वतीने क्रीडा विकास व शारीरिक क्षमता विकासावर भर दिला जात आहे . त्या अनुषंगाने अमरावती मध्ये सुद्धा क्रीडा विकासाचे धोरण अवलंबून जिल्हा क्रीडा संकुलाच्या कक्षा विस्तारून शहरातुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होण्याबाबत आ. सुलभाताई खोडके यांनी प्रयत्न चालविले आहे . याची फलश्रुती म्हणुन अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाकरीता शासनाने ८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधी अंतर्गत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रवेश द्वारासमोरील खुल्या शासकीय जागेवर मल्टीपर्पज स्पोर्ट हब साकारण्यात येणार आहे . जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर घालणाऱ्या या महत्वकांक्षी क्रीडा संकुलाच्या जागेची शनिवार दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी आ. सुलभाताई खोडके यांनी पाहणी केली .
महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा पायाभूत विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल बांधकाम करणे ही राज्य शासनाची योजना आहे .या योजनेचा अमरावतीमधील खेळाडूंना पुरेपूर लाभ व्हावा ,यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षण व स्पर्धांसाठी पर्याप्त सुविधा व्हावी ,व त्यातून सर्वसामान्यांना आपल्या अंगीभूत क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करता यावे न त्यांना उच्चकोटीचे प्रशिक्षण मिळावे , राष्टीय -आंतराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करता यावे , यातूनच आंतराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू निर्माण व्हावे असे व्हिजन आ’. सुलभाताई खोडके यांनी मांडले आहे . विद्यापीठाच्या गेटसमोरील शासकीय जागा नगर भूमापन क्रमांक 31/1 शीट नं. 3 प्लॉट नं. 9 पैकी 28000 चौ. मीटर एवढ्या जमिनीवर उभारण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा संकुल प्रकल्पांतर्गत विविध क्रीडा सुविधा निर्मितीसाठी जिल्हा क्रीडा समितीने रुपये १४३२. ७६ लक्ष इतक्या रकमेचे अंदाजपत्रक तयार केले होते . मात्र या प्रकल्पाअंतर्गत क्रीडा सुविधा निर्माण करण्याला घेऊन निधी अभावी अडचणी निर्माण झाल्या होत्या . यासंदर्भात आ. सुलभाताई खोडके लक्ष केंद्रित करीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अवगत केले . निधीच्या पूर्ततेअभावी अमरावती जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने क्रीडा सुविधा निर्मितीचे काम रखडले असून परिणामी खेलो इंडिया या पथदर्शी संकल्पनेला खीळ बसली असल्याची बाब आ. सुलभाताई खोडके यांनी उपमुख्यमत्री अजितदादा पवार यांच्या लक्षात आणून दिली . त्यामुळे विद्यापीठ समीपच्या जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी ८ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून त्यापैकी ४ कोटी ३१ लक्ष रुपये इतके अनुदान समितीस प्राप्त झाले आहे . याबाबत आ. सुलभाताई खोडके यांनी केलेले प्रयत्न फळास आले आहे . दरम्यान यावेळी जिल्हा क्रीडा संकुल समिती सदस्य सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी या प्रकल्पांतर्गत क्रीडा सुविधा निर्माण करण्याबाबत आमदार महोदयांना प्रस्तावपूर्वक माहिती दिली . जिल्हा क्रीडा संकुल समितीला प्राप्त ४ कोटी ३१ लक्ष रुपये अनुदानातून विद्यापीठ समीपस्थ प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलात आर्चरी रेंज ,प्रेक्षक गॅलरी ,लॉन , मल्टिजीम व वूडन व सिंथेटिक फ्लोरिंगसह ज्युडो हॉल, बास्केटबॉल क्रीडांगण स्केटिंग रिंक सह प्ले एरिया कबड्डी ,खो-खो, हॉलीबॉल करिता प्रत्येकी एक-एक मैदाने निर्माण करण्यात येत असल्याची माहिती समितीचे सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली . सदर कामासाठी होणारा खर्च पाहता उर्वरित निधी मिळण्यासाठी समितीने दुसरा प्रस्ताव तयार करावा, जेणेकरून यंदाच्या बजेट मधून आपण उर्वरित ४ कोटींरुपयांचे अनुदान उपलब्ध करून देणार असल्याचा विश्वास आमदार महोदयांनी यावेळी व्यक्त केला .
यावेळी आ. सुलभाताई खोडके यांनी संबंधित निर्माण कार्य हे दर्जेदार व गतीने व्हावे यासाठी क्रीडाविषयक सर्व पायाभूत सुविधांची उपलब्धता करण्याच्या सूचना दिल्या . तसेच या क्रीडा संकुलातील अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण , पाणीपुरवठा , अंतर्गत रस्ते ,सुशोभीकरण आदी कामांचे नियोजन करून हे क्रीडा संकुल लवकरात लवकर कसे साकारल्या जाईल , यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेऊन ,दर्जेदार सेवा उपलब्धीवर भर देण्याचे आमदार महोदयांनी यावेळी सूचित केले . जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकाम , अंतर्गत सुविधा व आवश्यक सेवांसाठी निधी कमी पडू देणार नाही. निधीची गरज भासल्यास क्रीडा समितीने तसा प्रस्ताव द्यावा ,या कामासाठी भरीव निधी शासनाकडून उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आ. सुलभाताई खोडके यांनी दिली . या पाहणी दौऱ्याप्रसंगी आमदार सुलभाताई खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके , जिल्हा क्रीडाधिकारी गणेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता मनीषा ख्ररैय्या , सहायक अभियंता एन . प्रकाश रेड्डी , यश खोडके , माजी महापौर विलास इंगोले , ऍड . किशोर शेळके, मनपा विपक्ष नेता बबलु शेखावत , माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, नगर सेवक प्रशांत डवरे , गजानन बरडे , संजय बोबडे , किशोर भुयार ,पप्पू खत्री ,अशोक हजारे , किशोर देशमुख , अजय दातेराव , महेंद्र भुतडा , मनीष देशमुख , सुनील रायटे , दिनेश देशमुख , नितीन भेटाळू , मनोज केवले , श्रीकांत झंवर , महेश साहू , ऍड . सुनील बोळे ,प्रमोद महल्ले , योगेश सवाई ,प्रवीण भोरे, मनीष करवा , जितेंद्र ठाकूर , मनीष बजाज ,माजी नगरसेवक रतन डेंडुले , लकी नंदा , प्रवीण मेश्राम , गजानन राजगुरे , मनोज उर्फ राजू भेले , रवींद्र इंगोले , गुड्डू धर्माळे ,निलेश शर्मा , धीरज श्रीवास , प्रमोद सांगोले ,दिलीप कडू ,निलेश गुहे , विजय बाभुळकर प्रवीण पारडे , प्रशांत पेठे , बंडू निंभोरकर , ऍड . शोएब खान ,सनाभाई ठेकेदार , गाजी जाहेरोश , सनाउल्ला सर , नदीमुल्ला सर ,हबीबभाई ठेकेदार , अफसर बेग , सय्यद साबीर , रफ्फु पत्रकार ,फारुखभाई मंडप वाले , अबरार भाई , साबीर पहेलवान , ऍड. शब्बीर , मेराजखान पठाण , रेहान शेख ,आहद भाई , फहीम मेकॅनिक , वहीद खान , सादिक राजा, मोहहम्द शारिक , परवेझ खान , अफझल चौधरी , हब्बू भाई , गुड्डू हमीद , दिलबर शाह , बिलाल खान , सादिक शाह , असिफ भाई , तनवीर आलम , भुरू भाई , जहाँगीर नंदावाले, योगेश सवई ,आदी सहित कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .