निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मानधन देण्याची प्रहार शिक्षक संघटनेची मागणी निवासी जिल्हाधिकारी मा.खडसे यांना दिले निवेदन

63

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

श्री.महेश ठाकरे,राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंगेश टिकार जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मानधन अदा करण्या संदर्भात प्रहार शिक्षक संघटनेने नुकतेच निवेदन दिले.अकोला जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२०, १५जानेवारीला यशस्वीपणे पार पडला.कोरोना प्रादुर्भाव असतांना कर्मचाऱ्यांनी ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडली.अकोल्या जिल्ह्यात २२४ ग्रामपंचायत करीता एकूण ८५१ मतदान केंद्रावर निवडणूक घेण्यात आली.सदर कामी सर्व विभागातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.दोन टप्प्यात प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष निवडणुकीचे दोन दिवस धरून चार दिवस कर्मचारी आपल्या कर्तव्यावर असतात त्यासाठी कर्मचारी यांना मानधन देण्यात येत असते. जिल्ह्यात जवळपास ४०००अधिकारी कर्मचारी या कामात व्यस्त होते.पण अद्यापही या कर्मचा-यांना मानधन मिळाले नाही.त्याबाबत प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने मा.निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली,त्यावर त्यांनी निधी उपलब्ध होताच सर्व कर्मचारी यांना विना विलंब अदा करण्यात येतील असे आश्वासन दिले.तसेच शासनाकडे निधीची मागणी करण्यात येत असल्याचे संघटनेला सांगितले.
यावेळी अमर भागवत जिल्हा कार्याध्यक्ष,अशोक गाडेकर उपाध्यक्ष,हेमंतकुमार बोरोकार जिल्हा संपर्कप्रमुख, राधेश्याम मंडवे सचिव,प्रवीण गायकवाड,तालुका प्रमुख अकोला,रशीद सर तालुका कार्याध्यक्ष अकोला, श्रीराम झटाले सर तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.सदर निवेदना बाबत जिल्हा उपाध्यक्ष आसीफ खान, अशोक गाडेकर, जव्वाद अहमद, सचीन धुमाळे, सुधीर भुस्कुटे, इम्रान खान,सुरेश वाकोडे, श्रीधर शेंडे, मोहंमद वसीम अकोटचे तालुका अध्यक्ष प्रमोद कोकाटे, मनोज मांडवे, पांडुरंग पवार, अजय ढोले,राजेश राठोड, तुषार हाडोळे, सुरेश बुटे, हिदायद खान,नरेश धुमाळे, अमीत फेंडर, नुसरत अली,अनिल फलके, अकोलाचे तालुका अध्यक्ष प्रविण गायकवाड, रशीदअहमद सर, निलेश देशमुख, राजेंद्र पाटोळे, निलेश राठोड, प्रमोद कुलसंगे, नदीम खान, राऊत सर, तेल्हारा तालुका अध्यक्ष अमोल ढोकणे, अमोल राखोंडे, गोपाल गि-र्हे, निखिल गि-र्हे, नजीम सर, संदीप भड,तेजराव वाकोडे,प्रविण चोपडे यांनी समाधान व्यक्त केले.