अखेर बालेकिल्ल्याला लागले सुरुंग

277

अनिलकुमार एन.ठवरे
ग्रामिण तालुका प्रतिनिधी आरमोरी
देलनवाडी :- कट्टर राजकारण काय असतो हे देलनवाडी या गावावरून सिखायला मिळतो. राजकारणातून समाजकारण करावा लागतो हे विसरलेल्या काही उच्च विद्याविभूषित नेतृत्व करण्याऱ्या लोकांना याचा विसर पडलेला आहे. पक्षापासून तर जातीपातीचा राजकारण करण्यामुळे आज देलनवाडीचा विकास खुंटलेला आहे. यामूळे या वेळेस सर्वसमावेशक असलेल्या व ज्याला समाजसेवेची चाळ आहे व जे जातीपातीच्या व पक्ष्याच्या राजकारणापासून अलिप्त आहेत अशाच उमेदवाराला जनतेनी कौल दिलेला आहे . या निमित्ताने कोणी दारू,चिवडा व पैसा या ताकदीवर मत विकत घेऊ शकतो या भ्रमात राहू नये त्याच बरोबर धर्मांध शक्तीने सुद्धा विचार करावा की नुसत्या जातीपातीच्या भरवश्यावर राजकारण करता येत नाही.