त्या चिमुकल्या मुलाच्या कलेचे भाजपा पदाधिकार्‍यांनी घेतली दखल… भविष्यात कुठलीही अडचण आल्यास मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहीन :- अमोल नगराळे

132

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

चंद्रपूर :- बाबुपेठ मध्ये आंबेडकर नगर बायपास रोड येथे राहणाऱ्या दिशांत दिलीप गेडाम, इयता 8 वी चा छोटू भाई पटेल महाविद्यालय चंद्रपूर याने नवीन पद्धतीने वस्तू बनवून अनेकांचे लक्ष वेधले आहे. ही गोष्ट सतीश धोटे यांनी भाजपा पदाधिकारी अमोल नगराळे यांना संगितली ही बाब लक्षात घेता भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट दिली व संपूर्ण माहिती मिळवली त्याने आजपर्यंत सोलर सोलर पॅनल वर चालणारा कुलर, वापरून झालेले खरड्या पासून ट्रॅक्टर, कंटेनर, ट्रक, इत्यादी वस्तू त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये तयार केल्या.

त्याला अभ्यास करण्याकरिता भाजपा पदाधिकारी यांचे कडून टेबल लॅम्प देण्यात आले. मोबाईल व ऑनलाईन च्या काळात जिथे मुले मोबाईलमध्ये वेळ वाया घालवतात. अश्या या काळात त्याने खरडे, वापरून झालेली पेन व सोलर पॅनल चा उपयोग करून छोटीशी बोअरवेल मशीन (खेळणे) तयार केले. त्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. सोलर पॅनल चा उपयोग करून त्याने जे खेळणे तयार केले ते खुप कौतुकास्पद आहे.