तालुक्यातील अकरा जवानांनी केंद्रीय सुरक्षा दलात निवड होवून देश सेवा करण्याचा मिळविला मान

243

सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी

सावली तालुक्यातील नुकताच लागलेल्या केंद्रीय सुरक्षा दलात निवड झाली असून अकराही जवानांनी देश सेवेचा मान मिळविल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केल्या जात आहे.बादल काशीनाथ खोब्रागडे सावली,प्रफुल सुनील बोरकर सावली,नितेश दिनेश वाढई सावली,सुनील सोकाजी मेश्राम कापसी,संजय आनंदराव डबले बेलगांव,मयूर राजेश मशाखेत्री,मोखाळा, भास्कर नेताजी गावडे, पेंढरी मक्ता,प्रणय नत्थुजी निकोडे पेंढरी मक्ता,चेतन झाडें, अंतरंगाव अंकुश श्रीरंग चौधरी विरखलं, गणेश मोहुर्ले असे 11 युवक बि.एस.एफ मध्ये आणि सी.आर.पी.एफ मध्ये दाखल झाले आहेत.अतिशय सामान्य घरामध्ये जन्म घेऊन देशाची सेवा करण्यासाठी तळमळ असलेल्या आणि नियमित अभ्यास करून देशसेवेत जाण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात.या सर्वांची परिस्थिती सामान्य, परिस्थिती तशीही थोडी गरीबच पण स्वतःला काहीतरी सिद्ध करायचं हे मनाशी बाळगले आणि तश्या दिशेनं हि जवान चालू लागले, मिळेल तो काम करायचे आणि रोज मिळेल त्या वेळामध्ये आपला सराव व अभ्यास करायचे. सर्वांशी मिळून राहायचे शेवटी मेहनत करून भरती झाले, पण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना या रोगाने सर्वांच्या मेहनतीवर पाणी फेरले होते आणि निकाल उशीरा लागणार अस जाहीर झाला. अस म्हनतात की “सब्र का फल मिठा होता है” आणि शेवटी काल निकाल लागला आणि काहीजण बी.एस.एफ.मध्ये तर काहीजण सि. आर. पी.एफ.मध्ये निवड झाली. त्याबद्दल या सर्वांचे ही तालुक्यामध्ये व गावामध्ये सर्व ठिकाणी कौतुक होत आहे.