नगरसेवक श्री.तुकाराम (सुरेश) कृष्णा पाटील यांच्या प्रयत्नाने मोफत कोविड-१९ चाचणी व रक्तदान शिबीर

143

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री सन्मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात विविध लोकउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, तसेच संपूर्ण मुंबई शहरातील रूग्णालयात मोठ्या प्रमाणात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन विभागप्रमुख श्री.राजेंद्र भिवा राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार प्र.क्रं.१२७ चे कर्तव्यदक्ष नगरसेवक श्री.तुकाराम (सुरेश) कृष्णा पाटील यांच्या प्रयत्नाने शिवसेना शाखा क्रं. १२७ च्या वतीने मोफत कोविड-१९ चाचणी शिबीर व संपर्पण रक्तपेढी (सर्वोदय रुग्णालय) यांच्या माध्यमातून शनिवार,दि.२५ जुलै २०२० रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी ज्या नागरिकांना घसा खवखवणे,सर्दी,डोकेदुखी,ताप,खोकला अंगदुखी व इतर लक्षणे असल्यास त्वरित सदर मोफत कोविड-१९ चाचणी शिबीराचा लाभ घ्यावा तसेच जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात भाग घेऊन रक्तदान करावे,
रक्तदान हेच श्रेष्ठ दान
शनिवार,दि.२५ जुलै २०२०.
वेळ : सकाळी ०९:०० वा.ते संध्याकाळी ०५.०० वा.
स्थळ : शिव वॅरियर्स मंडळ,दत्तात्रय नगर, क्रां.वा.ब.फडके मार्ग (गोळीबार रोड), घाटकोपर (प.),मुंबई.