आसेगाव कन्येच्या कर्तुत्वाला फुटले पंख संघमित्रा धांडे ची आसाम रायफल साठी निवड

224

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

देशातील सर्वात जुने निमलष्करी दल असलेला “आसाम रायफल” आतापर्यंत पुरुषांचा गड म्हणून ओळखला जायचा, मात्र आता या परंपरेला छेद देऊन आसाम रायफल मध्ये महिला उमेदवार सेवेत रुजू करून घेतले जात आहे.
केंद्रीय गृह आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त अख्यत्यारीत येत असलेल्या ‘आसाम रायफल” मध्ये अकोट तालुक्याच्या इतिहासात प्रथमच ग्राम आसेगाव बाजार येथील संघमित्रा महानंद धांडे या तरुणीची निवड करण्यात आली आहे.
आसाम रायफल (ए आर) मध्ये निवड झालेली संघमित्रा धांडे ही तालुक्यातील बहुदा पहिली तरुणी असल्याचा बहुमान तिने पटकावला आहे.
अकोट तालुक्यातील ग्राम आसेगाव बाजार येथील भूमिहीन शेतमजूर असलेले महानंद धांडे यांची मुलगी संघमित्रा हिने घरची कामे व शेतमजुरी करतात हे यश संपादन केले आहे.शालेय शिक्षण सुरू असताना डोक्यात सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याचे ध्येय ठेवून भारतीय सैन्यदलात भरती होण्याचा निश्चय करून संगमित्रा दररोज पहाटे चारला उठून पाच किलो मीटर धावणे व इतर कसरती, सैन्य दलात भरती होण्यासाठी जे करता येईल ते नियमित करत असे ,
शेवटी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने निमलष्करी दलात यश मिळविले,
राज्यात कोठेही सैन्य भरती निघाली कि ती निसंकोच भरती साठी जात असे,२०१९ च्या पोलीस भरती मध्ये अपयश आले तरी तिने जिद्द सोडली नाही कितीही अपयश आले तरी आपण भारतीय सैन्यदलात भरती व्हायचं हे पक्के ठरवले होते, शेवटी स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या कॉन्स्टेबल (जी.डी ) २०२० च्या परीक्षेत चांगले प्रयत्न करून,
दुसऱ्या प्रयत्नात तिने यश संपादित केले, संगमित्रा ही मैदानी लेखी आणि वैद्यकीय चाचणी मध्ये यशस्वी झाली असून लवकरच ती भारतीय सैन्य दला अंतर्गत येणाऱ्या निमलष्करी दलाच्या “आसाम रायफल” साठी देशसेवेत सहभागी होणार आहे.
अकोला जिल्ह्यातून “आसाम रायफल” या निमलष्करी दलात भरती होणारी संघमित्रा धांडे ही पहिलीच महिला असल्याचे तिचे मार्गदर्शक राजू खारोडे यांनी सांगितले,
संगमित्रा ही आसाम रायफल मध्ये निवड झाल्याने तालुक्यातील व गावातील तरुणी समोर तिने वेगळा आदर्श ठेवला आहे.