हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व हिंद सेनापती सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना वणी शहर तर्फे भव्य दौड स्पर्धा

86

 

विशाल ठोबंरे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

दि.२३ जानेवारी २०२१ रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व हिंद सेना सेनापती सुभाषचंद्र बोस यांचे जयंती निमित्त शिवसेना वणी शहर तर्फे भव्य दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी संजय निखाडे, राजू तुराणकर, दीपक कोकास, अजिंक्य शेंडे यांचे हस्ते झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
स्पर्धा ही दोन गटात ओपन पुरुष गट ,महिला खुला गट तर १८ वर्षा खालील मुले व मुली गट अश्या चार गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथम बक्षीस वृषल काकडे, वैष्णवी भुरसे, वैभव मोहितकर, राणी शेंडे. द्वितीय बक्षीस, विशाल देवाळकर, भाग्यश्री गोंडे, महादेव पिदूरकर, खुशी खिरेकर, तिसरे बक्षिस, विशाल झिले, सुप्रिया रामटेके, निखिल तोडसे, वैष्णवी तमानवार, चौथे बक्षीस, गणेश जोशी, शीतल बांगडे, अंकित सोयम, संस्कृती देठे याप्रमाणे व इतर प्रोत्साहन पर चोवीस बक्षिसे देण्यात आले.
प्रति गटात प्रथम बक्षीस २०००,द्वितीय बक्षीस १५००,तृतीय बक्षीस १००० व चौथे बक्षीस ५०० मोमेंटो व टी शर्ट देण्यात आले. याप्रसंगी प्रा. दिलीप मालेकर सर व डॉ. गजानन मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, संजय देरकर, राजू तुरणकर, सुनील कातकडे, दीपक कोकास, अजिंक्य शेंडे, ललित लांजेवार, महेश पहापले, मंगल भोंगळे, मुन्ना बोथरा, किशोर मुत्यालवार, राजेंद्र देवडे, निखिल देरकर, सचिन ठावरी,जनार्दन थेटे, भगवान मोहिते, डॉ.जुनगरी, बबन केळकर, प्रशांत गोहोकार, प्रवीण रोगे, मिलिंद बावणे, संजय गाथाडे, ईत्यादींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.