Home राजकीय आ.डॉ देवरावजी होळी यांची धानोरा येथिल बँकेला भेट देऊन जाणल्या समस्या व...

आ.डॉ देवरावजी होळी यांची धानोरा येथिल बँकेला भेट देऊन जाणल्या समस्या व सोडविण्याचे दिले निर्देश

137

धानोरा/भाविकदास करमनकर

शासनाच्या विविध योजना बँकेच्या माध्यमातून कशा प्रकारे राबविण्यात येत आहेत त्याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्याबाबतचे दिले पत्र
धानोरा येथील सर्व बँकांना भेट देऊन तेथील व्यवस्थापकांना शेतकरी व गरिबांना शासनाच्या सर्व योजना उपलब्ध करून देण्याचे दिले निर्देश
राज्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली परंतु प्रत्यक्षात कर्ज माफी न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे,कर्जमाफीसाठी तो वारंवार बँकांच्या चकरा मारत आहे , गरिबांना देण्यात येणाऱ्या योजना शासनाने बंद करून ठेवलेल्या आहेत, गोर गरीबांनाही बँकेच्या वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.ही बाब आमदार महोदयांनी लक्षात घेऊन धानोरा येथील सर्व बँकांना भेट दिली . शेतकरी व गरीब मजुरांना त्रास न देता त्यांचे काम तात्काळ करावे असे निर्देश बँकेच्या व्यवस्थापकांना दिले.
शेतकरी व गोरगरिबांची अडचण लक्षात घेवून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी धानोरा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, या सर्व बँकांना भेट दिली. तेथील उपस्थित नागरिकांशी संवादही साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश उपस्थित बँकेच्या व्यवस्थापकांना दिले
सोबतच महात्मा फुले कर्ज माफी योजना ,छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री किसान कर्ज माफी योजना, किसान क्रेडिट कार्ड, कृषी विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, (12 रुपये हप्ता ) प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना (330 रुपये वार्षिक हप्ता), मुद्रा योजना, पी एम.इ.जी.पी , स्टॅंडअप इंडिया,स्टार्ट अप इंडिया,एम.एस.एम. ई अंतर्गत होणारे विविध उद्योग अशा विविध मुद्द्याच्या आधारे बँकांच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती आमदार डॉक्टर यांनी पत्र देवून बँकेकडे केली आहे.तसेच शासनाच्या विविध योजना बँकेच्या माध्यमातून कशा प्रकारे राबविण्यात येत आहेत त्याबाबत केलेल्या कार्याची माहितीही उपलब्ध करून देण्याचे निर्देश आमदार डॉ देवराव जी होळी यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना पत्राच्या माध्यमातून दिले. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ जी साळवे,न प उपाध्यक्ष बाळू उंदिरवाडे नगरसेवक सुभाष धाईत सारंग साळवे, प्रकाश मारबते सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleगडचिरोली जिल्ह्यात विलगीकरणातील 65 एसआरपीएफ जवानांसह इतर 2 कोरोना बाधित
Next articleनगरसेवक श्री.तुकाराम (सुरेश) कृष्णा पाटील यांच्या प्रयत्नाने मोफत कोविड-१९ चाचणी व रक्तदान शिबीर