लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे नेताजी सुभाष चंद्रबोस जयंती साजरी

88

 

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “पराक्रम दिन” साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नीलिमा दवणे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी या होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आपल्या जीवनात जे बुद्धिचातुर्य आणि आपल्या उद्देश पूर्तीसाठी अनुकूल परिस्थिती वर कशा पद्धतीने मात करून आपले उद्देश कर पूर्ण केले. व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या जीवनात या महान नेत्यांचे आदर्श अंगीकारावे असे आव्हान विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते प्रा. डॉ. अभिजीत अणे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने सुभाषबाबूंच्या अगदी बाल्यावस्थेपासून ते कुमार अवस्थेपर्यंत आणि त्यांचे राष्ट्रीय काँग्रेस मधील कार्य,महात्मा गांधीजींची भेट व त्यांचा कलकत्ता पासून ते जर्मनी व जपान पर्यंतचा प्रवास अतिशय व ओजस्वी वाणीतुन विद्यार्थ्यांसमोर मांडला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. किशन घोगरे यांनी केले