सिरोंचा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाचे वर्चस्व

61

 

सिरोंचा…..सिरोंचा तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाने ग्रामीण भागात आपले वर्चस्व सिद्ध केले असून अर्धेअधिक ग्रामपंचायत मध्ये आविसचे उमेदवार बहुमताने निवडून आले आहे.

काल मतमोजणीनंतर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून यात आविसचे परसेवाडा, नरसिंहपल्ली,वेंकटापूर, गर्कपेठा, नारायणपूर सिरकोंडा,कोरला,कोपेला, रामांजपुर (वेस्ट लँड) लक्ष्मीदेवीपेठा, आसरअली,गोलागुडम,पेंटींपाका, टेकडा मोटला ,मोयाबीनपेठा येथे चार सदस्य, विठ्ठलरावपेठा येथे चार सदस्य सुंकारली येथे तीन सदस्य , जानांमपल्ली तीन,रामेशगुडम तीन,झिंगाणूर येथे 3 सदस्य असे आदी ग्रामपंचायत मध्ये
आविसचे उमेदवार मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आले.आविसने ग्राम पंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढविले.
आदिवासी विध्यार्थी संघाने तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक माजी आमदार व आविस नेते श्री दिपक दादा आत्राम व जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आली.
सिरोंचा तालुक्यातील ग्राम पंचायत निवडकांमध्ये आविस उमेदवारांना निवडून आनण्यासाठी आविसचे तालुका अध्यक्ष बानय्या जनगम,आविसचे ज्येष्ठ नेते मंदा शंकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आकुला मल्लिकार्जुनराव,आविस सल्लागार रवी सल्लम सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.