अवैध धंद्याला पायबंद घाला” आम आदमी पार्टी ची गृह मंत्री यांचेकडे मागणी.

134

 

ऋषी सहारे
संपादक

अवैध दारू विक्रेते , सट्टा बाजार, कोंबड बाजार, सुगंधीत तंबाखू तसेच रेती तस्करांवर पोलीस विभागाने आळा घालावा व पोलीस विभागाने जनतेला योग्यप्रकारे सेवा द्यावी या विविध विषयाचे निवेदन घेऊन आम आदमी पार्टी चे शिष्टमंडळ सुनिल देवराव मुसळे जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात गृहमंत्री अनिलराव देशमुख यांना भेटले आणि निवेदन दिले.
संपुर्ण चंद्रपुर जिल्हा हा अवैध धंदे बिनबोभाट पणे करण्यास प्रसिद्धी ला आला आहे. जे काम प्रशासनाला करायला पाहिजे ते काम लोक प्रतिनिधि करतात या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकते असा खडा सवाल आम आदमी पार्टी चे शहर अध्यक्ष इंजि. प्रशांत प्रभाकर येरणे यांनी गृहमंत्री यांना केला.
मंत्रीयांनी सबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात सुनिल भोयर, संतोष दोरखंडे , भिवराज सोनी, अशोक आनंदे, योगेश आपटे, हिमाऊ अली,अजय डुकरे, बबन क्रिश्नपल्लिवार, दिलीप तेलंग, राजू कुडे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.
राजेश शंकर चेडगुलवार
आम आदमी पार्टी,
चंद्रपूर जिल्हा, महानगर सोशल मीडिया प्रमुख यांनी प्रेस नोट द्वारे कळविले आहे.