Home कोरोना  गडचिरोली जिल्ह्यात विलगीकरणातील 65 एसआरपीएफ जवानांसह इतर 2 कोरोना बाधित

गडचिरोली जिल्ह्यात विलगीकरणातील 65 एसआरपीएफ जवानांसह इतर 2 कोरोना बाधित

168

 

कार्यकारी संपादिका. रोशनी बैस

गडचिरोली,(जिमाका),दि.25: काल रात्री गडचिरोली येथील विलगीकरणातील दौंड पुणे येथून आलेले एसआरपीएफचे 62 जवान, कीटाळी आरमोरी येथील 3 एसआरपीएफचे जवान कोरोना बाधित आढळून आले. तसेच इतर 2 मध्ये रशिया होऊन परतलेला आरमोरी येथील एकजण गडचिरोली येथे विलगीकरनात ठेवण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाला आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना वार्डातील एक कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.

यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त 235 तर सद्या सक्रिय कोरोनाबाधित 272 झाले आहेत. जिल्ह्यात एकूण बाधित संख्या 508 झाली आहे. एकुण संख्येमध्ये 364 सुरक्षा दलाचे जवान कोरोना आढळून आले आहेत.

Previous articleघुग्घुस येथील वहिनी व दिर दोघेही आढळून आले कोरोना पॉजिटिव
Next articleआ.डॉ देवरावजी होळी यांची धानोरा येथिल बँकेला भेट देऊन जाणल्या समस्या व सोडविण्याचे दिले निर्देश