योग्य चौकशीसाठी,”त्या, अल्पवयीन विद्यार्थीनींचा मृतदेह देतोय,”देशाच्या सिबिआयसह,”महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना वेदनादायक हाक! — न्याय वैद्य शास्त्राच्या तज्ञ टिम द्वारा हवा मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल.. — ४ आरोपींना अभय देण्याचा प्रयत्न शंकाजनक व गंभीर..आरोप दुर्वास भोयर पित्याचा…

0
537

संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
गोंदिया-मरारटोली येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणे व लैंगिक अत्याचार करुन घातपातातंर्गत अपघात करणे,हा घटनाक्रम अतिशय गंभीर असल्याचे दर्शविते.याचबरोबर गंभीर घटनाक्रमातंर्गत चौकशी संवेदनशील पणे न होणे,ही बाब सुध्दा चिंताजनक स्थितीचे चित्रन रेखाटते.यामुळे मृतक अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृतदेह,”देशाच्या सिबिआयसह,महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना,… वेदनादायक…”हाक,देतय,माझ्यावरील अत्याचाराची चौकशी निष्पक्ष करा हो!
एखादी गंभीर घटना घडली की अनेक तर्कवितर्कांना उधाण येते.तद्वतच घटना अतिशय गंभीर असली की समाजमन ढवळून निघते.याचबरोबर पोलिस अधिकारी गंभीर घटनाक्रमातंर्गत चौकशीला कशाप्रकारे वळन देतात यानुसार चौकशीच्या परिस्थितीचे आकलन केल्या जाते.पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशीचा कार्यभाग शंकाजन वाटत असला तर गंभीर घटना प्रकरण,अधिकाधिक गरम होते व जनमानसात चर्चेचा विषय बनते.असी क्रिया व प्रक्रिया मनुष्य मात्राच्या गुणधर्माचा भाग सहाजीक आहे.
म्हणूनच गोंदिया अंतर्गत मरारटोली येथील अल्पवयीन विद्यार्थिनीचे घातपात मृत्यू प्रकरण अतिशय संवेदनशील व तितकेच गंभीर आहे.अशा गंभीर प्रकरणाला मृतक विद्यार्थीनींच्या पालकांकडून घटनाक्रम समजून न घेता गोंदिया येथील रामनगर पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांनी,प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच आपल्या मनमर्जी प्रमाणे चौकशीचा कार्यभाग पार पाडला व मृतक मुलीच्या पालकांचा रामनगर पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांनी आपल्या स्वभावानुसार वारंवार अपमान केला असल्याचे आणि पालकांची अनाठायी अहवेलाना केली असल्याचे मृतक मुलीच्या आई-वडिलांचे मत गंभीर आणि वेदनादायक आहे.
मृतक विद्यार्थीनींच्या पालकांचे मुद्दे व घटनाक्रमातंर्गत पार्श्वभूमी लक्षात घेतले तर चौकशी प्रमुखांनी म्हणजेच गोंदिया रामनगर स्टेशनच्या ठाणेदारांनी त्यांच्या म्हणन्याकडे पुर्णतः दुर्लक्ष केले असल्याचे पुढे आले आहे.अर्थात गोंदिया येथील रामनगर पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांनी केलेली चौकशी वादग्रस्त ठरली असल्याचे चित्र आहे.
वादग्रस्त चौकशी निष्पक्ष आहे काय?हा प्रश्न अनेक शंकाकुशंकाना वाव देतो आणि पोलिस चौकशीवर अविश्वास दाखवतो.यामुळे ठाणेदार प्रमोद घुगे यांच्या चौकशीचा कार्यभाग वादग्रस्त आहे काय? व उर्वरित ४ आरोपींना अभय देणारा ठरतो आहे काय? या संबंधाने ठाणेदार प्रमोद घुगे यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
याचबरोबर गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डाॅक्टरांचा,घटनेच्या दिवसाला अनुसरून रोत्रोच्या वेळेस १० वाजता नंतर आलेला शवविच्छेदन अहवाल सुध्दा अविश्वसनिय तथा शंकाकृत असल्याचे पिडित कुटुंबियांचे म्हणणे असल्यामुळे,”न्याय वैद्य शास्त्राच्या तज्ञ टिम द्वारा,परत एकदा मृत्यूदेहाचे शवविच्छेदन होणे आवश्यक आहे.
यामुळे,गोंदिया येथील मृतक अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृतदेह,”देशाच्या सिबियासह,”महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना अतिशय वेदनादायक हाक देतोय,”माझ्या,महाभयंकर अत्याचाराची स्पेशल टिम द्वारा चौकशी करा हो!