शब्दगंध साहित्य परिषद अहमदनगरचा २०१९चा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार राजेंद्र थोरात यांच्या कुंकू ते दुनियादारी ग्रंथास जाहीर…

70

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने २०१९चा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रा.डाॅ राजेंद्र थोरात यांच्या *कुंकू ते दुनियादारी* ग्रंथास जाहीर झाला आहे.पुण्यातील चपराक प्रकाशनाने ‘कुंकू ते दुनियादारी’ ग्रंथ प्रकाशित केला. पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे सन्मानपूर्वक वितरण केले जाणार आहे असे शब्दगंध साहित्य परिषदचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी सांगितले.
प्रा.डाॅ.राजेंद्र थोरात वारजे-माळवाडी येथील संस्कार मंदिर कला व वाणिज्य महाविद्यालय येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून अध्यापनाचे कार्य करत आहेत.