खळबळजनक घटना, मोहर्ली येथे ईसमाची गळफास घेऊन आत्महत्या,कारण गुलदस्त्यात

0
75

 

विशाल ठोबंरे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

वणी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहर्ली येथे एका इसमाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
राजेंद्र भवानी मेश्राम (४५)रा.मोहर्ली असे मृतकाचे नावं आहे. आज दि.२३ जानेवारीला सकाळी ८ वाजताचे सुमारास मोहर्ली-वणी मार्गावरील नाल्याजवळ राजेंद्रचा मृतदेह एका झाडाला दोराने फाशी घेऊन असल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली.राजेन्द्रने आत्महत्या का केली याचे कारण गुलदस्त्यात असुन खरे कारण पोलिस तपासात निष्पन्न होणार आहे.