घुग्घुस येथील वहिनी व दिर दोघेही आढळून आले कोरोना पॉजिटिव

1537

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
मागील 4 महिन्यापासून कोरोना विषाणूच्या संसर्गा पासून सुरक्षित असलेले घुग्घुस शहरातील इंदिरा नगर वसाहतीत राहणारे वहिनी आणि दिर हे नागपूर येथे रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या नातेवाईकाच्या देखरेखी करिता रुग्णालयात होते.
मात्र रुग्णाची सुट्टी झाल्यानंतर हे दोघेजण घुग्घुस येथे परत आले नागपूर हे रेड झोन असून तेथून परत आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरन आवश्यक असतांना त्यांना गृह विलगीकरनात ठेवण्यात आले.
कोरोना तपासणीत ते संक्रमित असल्याचे निदान झाल्यामुळे घुग्घुस शहरात दहशत पसरली आहे. आता ह्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येईल. अलिकडच्या काळात घुग्घुस परिसरात सामाजिक कार्यक्रम , वाढदिवस, पार्टी तसेच विविध राजकीय पक्षांची आंदोलने करण्यात आलीत मात्र त्या ठिकाणी सुध्दा साधे मास्क लावण्याची व सोशल डिस्टन्स पाळण्याची काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
आता घुग्घुस शहरात कोरोनाचे झालेले आगमन यांच्या अश्या बेजबाबदार वागण्यामुळे किती पसरतो हे काळच सांगेल.