सोनसरी येथे ग्रामविकास पॅनल विजय

0
137

 

राजू रामटेके तालुका प्रतिनिधी कुरखेडा.

सोनसरी :- ग्रामपंचायत कार्यालय येथे ऐकून 9 सदस्यांची संख्या असून 9 पैकी 5 सदस्य 1) झुनुकलाल चौधरी 2 )यमुना चौधरी 3) ममता गोटा 4 )रेवता पुराम 5)मीनाक्षी वटी हे उमेदवार निवडून आले असून या अगोदर एकहाती सत्ता होती. परतू 35 वर्षाचा रेकॉर्ड ग्रामविकास पॅनलने मोडून काढला. सोंनसरी मतदारांनी युवा सदस्यांची निवड केली. यामध्ये ग्रामविकास पॅनलचे सूत्रधार माधव दहिकर, पुष्पलता मासरकर ,राजू रामटेके, अशोक हलामी , संतलाल हिडको ,कुसन चौधरी यांनी मोलाची कामगिरी पार पाडली असून गावात एकच उत्साह निर्माण झाला असून फक्त सरपंच कोण बनेल ? यांची सर्वांची नजर लागली आहे.