शाखाध्यक्ष मयुरी व गणेश लांडगे आयोजित हळदीकुंकू समारंभ व उखाणे स्पर्धा संपन्न उखाणे स्पर्धेत सोन्याची नथ मनिषा खंडागळे यांनी पटकावली

571

 

दिलीप अहिनवे
प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

कल्याण (ठाणे), दि. २३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणकरपाडा प्र. क्र. २९ चे शाखाध्यक्ष गणेश लांडगे व मनसैनिक मयुरी लांडगे यांच्या वतीने हळदीकुंकू समारंभ व उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ निवास, सुखदेव भोईर कॉलनी, ठाणकरपाडा, कल्याण (प.) येथे २१ जानेवारीला संध्याकाळी ७ ते १० दरम्यान हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपस्थित महिलांना हळदीकुंकूचे वाण त्सुनामी बाउल भेटवस्तू म्हणून देण्यात आले. जवळपास १२०० महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावुन लाभ घेतला. उखाणे स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना महिला मनसे पदाधिकारी यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणकरपाड्याचे शाखाध्यक्ष गणेश लांडगे यांनी समाजोपयोगी उपक्रमांचा सपाटा लावला आहे. स्थानिक नागरिकांत त्यांची प्रतिमा उंचावत चालली आहे. या प्रभागाला त्यांच्या रुपाने एक तरुण तडफदार व अभ्यासू नेतृत्व लाभले आहे. थोरा मोठ्यांसोबत अतिशय नम्रपणे संवाद साधुन सहकार्य करत आहेत. लोकांची कामे करणारा खराखुरा समाजसेवक म्हणुन त्यांचा नावलौकिक झाला आहे. त्यांचे संघटन कौशल्य देखील वाखाणण्याजोगे असून विविध उपक्रम राबवुन कार्यकर्त्यांना सक्रीय ठेवत आहे.

कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका तृप्ती भोईर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मनसे सचिव उर्मिला तांबे, जिल्हा अध्यक्षा स्वाती कदम (कल्याण), नयना भोईर (मुरबाड), जिल्हा उपाध्यक्षा सुनिता शेलार, शहर अध्यक्षा शितल विखणकर, शहर उपाध्यक्षा सुरेखा महाजन, शहर सचिव अर्चना चिंदरकर, शहर संघटक स्मिता खरे, विभाग अध्यक्षा अनिता म्हाप्रळकर, शाखा अध्यक्षा दीपाली विचारे, श्रध्दा अमृते, ज्योती नाईक, कल्पना मदने, मनिषा पोवार, सोनाली पवार व गीता कात्रप या पदाधिकारी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला जवळपास १२०० महिलांनी उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता किरण यांनी अतिशय सुंदररित्या करुन उपस्थितांचे मनोरंजन केले. पाहुण्यांसहीत अनेक स्पर्धक महिलांनी दर्जेदार व मनोरंजक उखाणे घेतले. निकाल खालील प्रमाणे : १) प्रथम क्रमांक : सोन्याची नथ – मनिषा खंडागळे २) द्वितीय क्रमांक : पैठणी – सुषमा पवार, ३) तृतीय क्रमांक : आकर्षक भेटवस्तू – संजना पर्वतीकर, ४) चौथा क्रमांक : आकर्षक भेटवस्तू – सुरेखा मालुंजकर ५) पाचवा क्रमांक : आकर्षक भेटवस्तू – छाया मोरे

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाखा अध्यक्षा दीपा साबळे, उपाध्यक्षा अलका शेजवळ, भारती लांडगे, योगिता ठाणगे, आशा अहिनवे, पल्लवी बांबरकर, प्रतिभा सुगवेकर, राणी देवरे, रश्मी लांडगे, मोनिका पवार, प्रियंका भोईर, माया दातार, पूजा कुलकर्णी, सविता वाघ, स्वाती मोरे, प्रीती भोईर व प्रगती भोईर यांनी मेहनत घेतली.

मनसैनिक राहुल जोशी, राजु मोजीद्रा, सुरेश कदम, महेंद्र कर्पे, रवींद्र जाधव, सुनिल भालेराव, सागर उमवणे, विनायक भालेराव, अथर्व सावंत, प्रसाद साबळे, चिराग जावळे, सुरज सोनी, प्रेम गुरव, प्रकाश चावरे, अतुल प्रजापती, विनायक सुगवेकर, प्रथम भोईर व गौरव भोईर यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.