सावरा वासियांना शिवचरित्रकार ह.भ. प. ज्ञानेश्वरी शेटे यांनी केले मंत्रमुग्ध

96

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

अकोट तालुक्यातील ग्राम सावरा येथे स्थानिक गाडगे महाराज संस्थान येथे दि 22/1/20 ला शिवचरीत्रकार बालकीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वरी दिदी शेटे वय १० वर्ष यांनी सावरा वासियांना कीर्तनातुन मंत्र मुग्ध केले .थडंगार गारवा वातावरणातही सर्व सावरा परीसतील श्रोते गण सदर कीर्तनाचा आस्वाद घेऊन या बालकीर्तनकाराचे भरभरुन कौतुक केले. विशेषता कीर्तनाच्या पुर्वीच श्रोत्यांना या कीर्तनाची ओढ लागली होती हे विशेष सदर गाडगे महाराज संस्थान कीत्येक वर्षापासुन भागवत सप्ताह ची परम्परा आविरत पणे चालु आहे. या वर्षी सुध्दा ह. भ. प. श्रीमान गजानन महाराज गहले देऊळगांव यांच्या पावन सुमधुर वाणीतुन भागवत कथेचा प्रारंभ झाला
बालकीर्तनकार कु. ज्ञानेश्वरी शेटे यांच्या संपुर्ण कीर्तनाचा सावरा मंचनपुर व परीसरातील जनतेने पुर्ण लाभ घेतला संपुर्ण सभा मंडम गच्च भरूण गेला होता.कधी कधी या कीर्तनातुन महिला व पुरुषांना या बालकीर्तना भरभरून हसु आणले या प्रसंगी कीर्तनातील संचातील मंडळीनी भरभरून साथ दिली .
या वेळी संस्थान चे अध्यक्ष व सर्व संचालक यांनी शेवटी कु. शेटे यांचा यथोचित गौरव केला या प्रसगी बहुसंख्य ग्रामस्थांची उपस्थिती होती.