जळगावमध्ये जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धा संपन्न मुलांमध्ये एकलव्य संघ तर मूलींमध्ये रायसोनी शाळा अव्वल

93

 

दिलीप अहिनवे
प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

जळगाव, दि. २३ : शिवसेना महानगर जळगाव, युवाशक्ती फाऊंडेशन व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बी. यु. एन. रायसोनी विद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हास्तर डॉजबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या गटात एकलव्य क्रीडा संकूल विजयी, स्वामी विवेकानंद महाविद्यालय उपविजयी तर नुतन विद्यालय-चुंचाळे (ता. चोपडा) तृतीय स्थानी तर मूलींच्या गटात बी. यु. एन. रायसोनी मराठी शाळा विजयी, स्वामी विवेकांनद कॉलेज उपविजयी तर रायसोनी इंग्लिश शाळा तृतीय स्थानावर विजयी झाले.
स्पर्धांचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसैनिक व युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, शिवसेना महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा शोभा चौधरी, बी. यु. एन. रायसोनी शाळेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष रायसोनी, एम. आय. डी. सी. पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, प्रकाश वेदमुथा, जाकिर पठाण, गणेश गायकवाड, हेमंत महाजन, जितेंद्र छाजेड, साई मोरया ग्रुपचे अध्यक्ष उमाकांत जाधव हे उपस्थित होते.
पारितोषिक वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, युवाशक्तीचे विराज कावडीया, उमाकांत जाधव, रायसोनी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, जिल्हा युवा क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.रणजित पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. स्पर्धेत मुलांचे १८ तर मुलींचे ८ संघ सहभागी झाले होते. स्पर्धा बाद पद्धतीने घेण्यात आल्या.
पंच म्हणून जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे निलेश पाटील, प्रशांत महाजन, सुनिल बाविस्कर, योगेश सोनवणे, प्रकाश सपकाळे, सुश्मित पाटील, ललित कोळी, उज्वल जाधव, चेतन जोशी, जयविरसिंग राजपूत, गौरव शिरसाळे, मुकेश परदेशी, विजय विसपुते यांनी काम पाहिले.
स्पर्धा समन्वयक म्हणून योगेश सोनवणे यांनी काम पाहीले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे सचिव अमित जगताप, उपाध्यक्ष संदिप सुर्यवंशी, प्रितम शिंदे, आकाश वाणी, धिरज पाटील, सौरभ कुलकर्णी, गोकुळ बारी, प्रसन्ना जाधव, अमोल गोपाल, राहूल चव्हाण, जयेश महाजन, प्रशांत वाणी, निखील पाटील, शंतनू नारखेडे तसेच जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्पर्धा प्रमुख तसेच जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी तर शेवटी सर्वांचे आभार सहसचिव निलेश पाटील यांनी मानले.