नियम न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर शहर वाहतूक शाखेचा कारवाईचा धडाका पहिल्याच दिवशी ४० ऑटो केले जमा

86

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

अकोला शहरात आवश्यकते पेक्षा खूप जास्त ऑटो धावतात एवढ्या मोठ्या संख्येने धावणाऱ्या ऑटो मुळे अगोदरच रस्त्याचे क्षमतेच्या मानाने जास्त असलेल्या वाहतुकीवर आणखीनच खूप ताण पडतो, त्यातच निर्माणधीन रस्ते, उड्डाणपूल ह्या मुळे रस्त्यांची खस्ता हालात झाल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्याचा खूप मोठा ताण वाहतूक पोलिसांवर दिवसभर असतो.ह्या साठी रास्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून,शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी अकोला शहरातील ऑटो चालकांना वाहतूक नियम पाळण्या विषयी मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन तसेच स्ट्रीट मीटिंग चे माध्यमातून प्रथम प्रबोधन केले, परंतु फक्त प्रबोधन करून न थांबता वाहतूक नियमांचे भंग करणारे, रस्त्यात कोठेही ऑटो थांबवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे, दंडात्मक कारवाईची रक्कम बाकी ठेवणारे ऑटो चालकांचे ऑटो पकडून कार्यालयात लावण्याची धडक मोहीम दि. २३ जानेवारी पासून सुरू करण्यात आली,ह्या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जवळपास ४० ऑटो वाहतूक कार्यालयात लावण्यात आले, लावलेल्या ऑटो च्या चालकांना एकत्रित करून त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याची तंबी देण्यात आली, तसेच चालन बाकी असलेल्या ऑटो चालकाकडून दंडाची पूर्ण रक्कम भरून घेण्यात आली तसेच दंड न भरणारे ऑटो तसेच वाहतूक कार्यालयात थांबवून ठेवण्यात आले.
बेशिस्त व वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या ऑटो चालकांचे ऑटो वाहतूक कार्यालयात अटकावून ठेवून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी ऑटो चालकांना दिला असून ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगितले.