शिवसेना कार्यालय एटापल्ली येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

0
68

सदाशिव माकडे (प्रतीनिधी)
(बातम्या व जाहिराती करीता 8275228020)

ऐटापल्ली :-
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे स्फूर्तीचा जिवंत झरा..लाखो शिवसैनिक आणि कोट्यवधी हिंदूंचे दैवत..या प्रखर शिवतेजाने मराठी माणसाच्या मनगटात आत्मविश्वासाचा वन्ही चेतावला..स्वाभिमानाची उर्मी जागवली..मनामनात हिंदुत्वाचा अंगार फुलवला..शिवसेनाप्रमुख म्हणजे देव, देश आणि हिंदुत्वरक्षणाचे सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५ वी जयंती निमित्य शिवसेना कार्यालय एटापल्ली येथे प्रथम हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे अमर रहे अमर रहे असं जयघोष शिवसैनिकांनी केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार,शिवसेना तालुका प्रमुख किसन मठ्ठामी, शिवसेना शहर प्रमुख मनिष भाऊ दुर्गे, युवासेना तालुका प्रमुख राहुल भाऊ आदे, दामोधर भाऊ नरोटे कसनसुर, सुरेश करमे, इशांक भाऊ दहागावकर, प्रसाद दासरवार, राघव सुल्वावार, भुपेन बारोई, सुजल वाघमारे, तनुज बल्लेवार, बोवा पेंदाम, युवासेना शहर प्रमुख महेंद्र सुल्वावार, संतोष गंधेशिरवार, विलास पेरमिलवार व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.