शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आळंदीत अभिवादन

79

आळंदी दि.२३ प्रतिनिधी : मराठी अस्मिता अर्थात मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि विखुरलेल्या हिन्दुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व व वक्तृत्वाचा बाण भात्यातून काढणारे तेजस्वी नेतृत्व,मराठी माणसाचा कणा ताठ असल्याचं जगाला दाखविणारे बाळ केशव ठाकरे अर्थात हिंदु हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी ९५वी जयंती निमित्ताने आळंदी शहरात विविध ठिकाणी अभिवादन करून साजरी करण्यात आली तसेच आळंदी ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करण्यात आली.
शिवतेज चौक येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आळंदी शिवसेना शहराच्या पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना शहरप्रमुख अविनाश तापकीर,नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे,शिवसेना नेते उत्तम गोगावले,माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे,रमेश गोगावले,डी.डी.भोसले पाटील,बाळासाहेब कुर्‍हाडे,शशिकांत राजे जाधव,बाळासाहेब डफळ,बालाजी शिंदे,संदीप पगडे,राकेश जाधव,संदीप कायस्थ,राहुल गोरे,मंगेश तीताडे,संदीप नाईकरे,मंगल हुंडारे आणि संगीता पफाळ उपस्थित होते.
तसेच भैरवनाथ पतसंस्था आणि शिवसेना कार्यालय देहूफाटा आळंदी येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले करण्यात यावेळी माजी जिल्हाप्रमुख राम गावडे,माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर,प्रसाद दिंडाळ,तुषार तापकीर,निखिल तापकीर उपस्थित होते.