शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी फडकाविला आष्टी ग्रा.प.वर भगवा १५ पैकी १३ जागा जिंकत एकहाती सत्ता केली काबीज

507

 

उपसंपादक / अशोक खंडारे

चामोर्शी तालुक्यातील आष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी फडकाविला भगवा १५ पैकी १३ जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज करण्यात यश संपादन केले आहे
यापूर्वी सुद्धा दहा वर्षे त्यांचीच सत्ता होती. शहर विकास आघाडी स्थापन करुन निवडणूक लढवली होती त्यामुळेच
प्रभाग क्रमांक १ मधून संतोष बारापात्रे , लता पोरटे, रुपाली कटकमवार, प्रभाग क्रमांक २ मधून सत्यशिल डोर्लीकर, रेश्मा फुलझेले, सुनंदा आंबटकर, प्रभाग क्रमांक ३ मधून कपील पाल, लाजवंती आउतकर, विघा जुनघरे, प्रभाग क्रमांक ४ मधून विनोद दुर्गे प्रभाग क्रमांक ५ राकेश बेलसरे,पुणम बावणे, बेबी बुरांडे असे १३ उमेदवार विजयी झाले. तर कांग्रेस च्या पदरात प्रभाग क्रमांक ४ मधून दिवाकर कुंदोजवार व आशिष बावणे हे विजयी झाले.
यापूर्वी सुद्धा दहा वर्षे आष्टी ग्रामपंचायत मध्ये बेलसरे यांची सत्ता होती याहीवेळी जनतेने त्यांनाच सत्तेच्या चाव्या सोपविल्या आहेत.
आपल्या कामाचे हे फलीत आहे असे बेलसरे यांनी मत व्यक्त केले.