BRSP शाखा घुग्घुस च्या माध्यमातून पो. स्टेशन घुग्घुस ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले निवेदन

192

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
दीनांक 24/7/2020 रोज शुक्रवारला BRSP च्या माध्यमातून संविधान तज्ञ अडॅ. डॉ. सुरेश. माने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बि.आर.एस.पी यांच्या आदेशानुसार सर्वत्र महाराष्ट्र राज्य व्यापी ठीक ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यां मार्फत मा. मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांना निवेदने देण्यात आलेले आहे. त्याच प्रमाणे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस च्या माध्यमातून सुद्धा हे निवेदन सुरेश मल्हारी पाईकराव चंद्रपूर जिल्हा महासचिव यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली.
महाराष्ट्रातील आम जनतेच्या ज्वलंत प्रश्नाला समजून षोशित पीडित वर्गावर होत असलेल्या दैनंदिन अन्याय अत्याचारावर आळा घालण्यासाठी ठोस पाऊल या महाराष्ट्र राज्य सरकाराने घ्यावा व त्यांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून आम जनतेच्या गंभीर प्रश्नांचे निवारण या महाराष्ट्र राज्य सरकारने करावे.
जनतेच्या खालील प्रमुख पाच ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी BRSP शाखा घुग्घुस कडुन निवेदन देण्यात आले .
(1) आंध्र प्रदेश सरकारच्या धरतीवर महाराष्ट्र सरकार SC/ST बजेट विनियोगाबाबत स्वतंत्र कायदा तयार करणे.
(2) राज्यात सर्वत्र SC/ST, NT/VJNT मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा / तालुका या ठिकाणी वसतिगृहाची सोय करणे.
(3) परराज्यातील मजुरांचे स्थित्यंतर व कोरोना कालखंडातील प्रचंड हाल लक्षात घेऊन परराज्य मजुरांचे नोदणीकर / व्यवस्थापन करणे व राज्यात नव्या उधोगात 80% नोकर्‍या भूमिपुत्रांना देण्यात यावे.
(4) उपेक्षित मागासवर्गीय यांची पाहाणी करून प्रत्येक कुटुंबात किसान एक पात्र उमेदवारास सरकारी नोकरी देणे.
(5) पेसा कायदा अमलबजावणी व आदिवासी जमीन वनहक्क कायदा अंतर्गत जमीन पट्टे देऊन त्यांचे 3 महिन्यात पुनर्वसन करावे.

वरील पाच मागण्या महाराष्ट्र राज्य सरकारने ज्वलंत गतीने पूर्ण करावे असे निवेदन पो. स्टेशन घुग्घुस चे ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्फत मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांना देण्यात आले. निवेदन सादर करताना बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी घुग्घुस जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले निवेदन सादर करताना योगेश नगराळे, अशोक आसमपल्लीवार, जगदीश मारबते,प्रविण यादव, सागर बिराडे, राजेंद्र थेरे, राकेश कातकर, प्रदीप खोब्रागडे, करण बिराडे, सुमित फुलकर, राकेश पारशिवे, तसेच BRSP चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.