मका खरेदी करण्याची 31 जुलैपर्यंत मुदत वाढविली- डॉ.नामदेवराव उसेंडी

0
115

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

गडचिरोली दि25जुलै
जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन झाले होते. यावर्षी शासनाने 90 हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवून 30 जून पर्यंत खरेदी करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार धानोरा तालुक्यात पेंढरी व मुरुमगाव या भागातील मका खरेदी करण्यासाठी धानोरा येथे मका खरेदी केंद्र सुरू केले व त्याची मुदत 15 जुलैपर्यंत ठेवली होती त्यानुसार शेतकऱ्यांकडून सातबारा घेऊन मका खरेदी करण्यासाठी नंबर लावण्यात आले. ऑनलाइन नोंदणीसाठी प्रति सातबारा दोनशे रुपये आकारणी करण्यात आली व शेतकऱ्यांना मोबाईल नंबर घेऊन आपला नंबर त्यावेळेस येईल त्यावेळी कळवू असे केंद्रातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले परंतु खरेदी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचा बोगस सातबारा घेऊन शेतकर्‍याऐवजी व्यापाऱ्यांचे पैसे घेऊन मका खरेदी केल्यामुळे प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांचे 10 व 12 नंबर वर असलेल्या शेतकऱ्यांची सुद्धा मका खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे पेंढरी, मुरुमगाव ,पंनेमारा , सूर्सुंडी, मालेवाडा , जयसिंग टोला या भागातील शेतकऱ्यांनी याबाबत डॉ. नामदेवराव उसेंडी जिल्हाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यांचेकडे तक्रार केली असता याबाबत टीडीसी चे नाशिक येथील MD नितीन पाटील यांच्याशी मका खरेदी करण्यास मुदतवाढ देण्याबाबत व शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्याचा मका खरेदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करणेबाबत दूरध्वनीवरून तक्रार केली असता मुदत वाढ व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या सही चे मका खरेदी करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवून दिल्याचे पत्र प्राप्त झालेले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असेल त्यांनी मका खरेदी केंद्रातील कर्मचाऱ्यांची संपर्क साधून शासनास मका विक्री करावा असे आव्हान डॉ. नामदेव उसेंडी माजी आमदार तथा अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी केले आहे.