Home क्राइम वणीत रेती तस्करांचा धुमाकुळ सुरुच, छोट्या हत्तीने होत आहे रेती तस्करी, महसुल...

वणीत रेती तस्करांचा धुमाकुळ सुरुच, छोट्या हत्तीने होत आहे रेती तस्करी, महसुल विभागाचे दुर्लक्ष

156

 

वणी : परशुराम पोटे

वणी शहरात रेती तस्करी काही थांबता थांबेना, कारण येथिल महसुल विभागाने रेती तस्करांच्या समोर ‘नांग्या’ टाकल्या की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील विविध भागात सद्या छोट्या हत्ती च्या सहाय्याने रेती तस्करी सुरु आहे. काही दिवसाअगोदर दोन छोटा हत्ती रेती तस्करीत जप्त केले आहे. परंतु रेती तस्करी मात्र सुरुच आहे. शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडत असल्यामुळे,प्रशासन रेती तस्करांवर वारंवार कारवाया करुन सुद्धा रेती तस्करी का थांबत नाही? हा संशोधनाचा विषय असला तरी महसुल विभाग मात्र ‘डोळे मीटुन दुध’ पिण्याचे सोंग तर करित नाही ना?आता या रेती तस्करांवर कारवाई कोन करणार? असा प्रश्न या निमित्याने निर्माण झाला आहे.
शहरातील निळापुर ब्राम्हणी रोड, पंचशिल चौक, साई नगरी, इंदिरा चौक,टागोर चौक, यासह विविध भागात मोठ्या प्रमाणात रेती पुरवठा होत अाहे. याकरिता निळापुर ब्राम्हणी फाटा व इंदिरा चौकात ‘चौकीदारांचा’ लक्ष ठेवण्याकरिता खास पहारा असल्याचेही बोलले जात आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Previous articleकामठीत काल पुन्हा आढळले 36 नवे कोरोना पाँजिटीव रुग्ण
Next articleमका खरेदी करण्याची 31 जुलैपर्यंत मुदत वाढविली- डॉ.नामदेवराव उसेंडी