Home नागपूर कामठीत काल पुन्हा आढळले 36 नवे कोरोना पाँजिटीव रुग्ण

कामठीत काल पुन्हा आढळले 36 नवे कोरोना पाँजिटीव रुग्ण

311

 

कामठी /नागपुर:25 जुलै 2020
नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात काल रात्री 7 वाजेपर्यंत एकूण 36 रुग्ण कोरोनाबधित आढळले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता अधिकच सतर्क राहावे. कामठी तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्या अतिमुक्त सःचाराची सवय बदलविण्याची तसेच मास्क वापरण्याची गरज आहे. विनाकारण घराबाहेर बाहेर फिरणे, मास्कचा वापर न करणे तसेच फिजीकल डिस्टेंसिंग न पाळणे यामुळे आता कोरोना विषाणु ने आपली व्याप्ती वाढवलेली दिसते. कोरोना आम्हाला होत नाही. आम्ही फलाने या धर्माचे आहोत की त्या धर्माचे? असे भंपकगिरी करणाऱ्यांनी आता हे समजून घ्यावे. कोरोना कोणालाही होऊ शकतो हिंदु असो कि मुस्लिम? कोरोना विषाणु जात / धर्म बघत नाही. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा सर्व बंद आहेत. कोरोना पासुन वाचवायला कोणी देव येणार नाही. डॉक्टर्स च तुमचा प्राण वाचवेल हे समजुन घ्या. शासन व प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देश व नियमांचे पालन केले तरच आपण कोरोना स हद्दपार करु
आजपावेतो एकूण 334 रुग्ण हे कोरोना पोजिटिव्ह आढळले आहेत. यातील 90 रुग्ण हे कोरोनावर मात घेऊन घरी परतले आहेत यानुसार सध्या 244 रुग्ण हे कोरिणाबधित आहेत
काल कामठी तालुक्यात एकूण 36 कोरोना पोजिटिव्ह आढळल्या रुग्णामध्ये पेरकीपूरा 03, तुंमडीपुरा 01, इस्माईलपुरा 05, न्यू खलाशी लाईन 02, दाल ओली 02, छावणी परिषद 01, जयभीम चौक 03, नवीन कामठी पोलीस स्टेशन 01, जे एन रोड 02, म्हसाळा 01,खसाळा 01,हमालपुरा 01,जुनी ओली 02,हरदास नगर 02, वारीसपुरा 04,उंटखाना 01,भाजीमंडी 01, गोराबाजार 01,खतीजबाई हायस्कुल जवळ 01,शुक्रवारी बाजार 01 रुग्णाचा समावेश आहे. तर आजपावेतो मृत्यू झाल्याची संख्या ही 07आहे.
त्यामुळे सतर्क राहा, सुरक्षित राहा व मास्क चा वापर करा. कोणतेही धार्मिक सण सार्वजनिक रित्या साजरे करु नका आणि गर्दी टाळा..

Previous articleगणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एकच नियमावली असावी -स्वराज्य ट्रस्ट
Next articleवणीत रेती तस्करांचा धुमाकुळ सुरुच, छोट्या हत्तीने होत आहे रेती तस्करी, महसुल विभागाचे दुर्लक्ष