गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एकच नियमावली असावी -स्वराज्य ट्रस्ट

244

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

खेड – कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने एकच नियमावली तयार करावी अशी मागणी स्वराज्य ट्रस्ट यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे
कोकणातील महत्त्वपूर्ण असा गणेश उत्सव सण या गणेश उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी येतात मात्र सध्या राज्यात सुरू असलेलं कोरोनाचे थैमान पाहता येणाऱ्या चाकरमान्यांना गावातील सरपंच त्याच्या तालुक्यातील महत्त्वाचे पदाधिकारी त्यांना चौदा दिवस विलगीकरण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र या आधीच मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन असल्याने अनेक जण आपल्या कामावर हजर नव्हते त्यानंतर राज्य सरकारने पुन्हा लॉकशिथल प्रक्रिया सुरू केल्यावर अनेक चाकरमानी पुन्हा कामावर रुजू झाले मात्र आता पुन्हा गणेशोत्सवासाठी 14 दिवस विलगीकरणाचे धरून दहा दिवसाचा गणेश उत्सव असे 25 ते 26 दिवस सुट्टी मिळणे अवघड आहे. आणि जर गणेशोत्सवासाठी 26 दिवस सुट्टी टाकली तर ती पुन्हा बिनपगारी होण्याची शक्यता असल्याने व आर्थिक अडचणीत जॉब जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी कोकणातील चाकरमान्यांसाठी कमीत कमी दिवसाचा विलगीकरण कालावधी करून गणपतीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एकच नियमावली करावी अशी मागणी स्वराज्य ट्रस्ट यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा ,दापोलीचे आमदार योगेश कदम यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

दखल न्यूज भारत