खाजगी शाळांमधील शिक्षकांना अर्धा पगार देणाऱ्या संस्थांविरोधात समविचारी आंदोलन छेडणार

0
145

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : पालकांकडून दामदुप्पट फी घेऊन तिजोरी भरणा-या अनेक खाजगी शाळात करोनाच्या निमित्ताने अर्धा तर काही ठिकाणी एकतृतींश पगार देण्यास सुरवात केली आहे.यातून त्या शिक्षकांची चेष्टा असून उत्पन्नाचा अन्य मार्ग नसलेल्या शिक्षकांना आर्थिक संकटात लोटणारी आहे,खाजगी संस्था चालकांनी वेळीच भानावर येऊन संपूर्ण वेतन अदा करावे अन्यथा या शिक्षकांसाठी तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचचे प्रांताध्यक्ष बाबासाहेब ढोल्ये यांनी दिला आहे.
खाजगी संस्था चालकांची ही मनमानी आहे.अर्धा आणि एक तृतीअंश पगार देण्याची ही भुमिका माणुसकीला धरुन नाही.या तुघलकी निर्णयाला कडाडून विरोध केला जाईल.नोकरी जाईल या भीतीने अनेक शिक्षक गप्प आहेत.अशांनी समविचारीच्या पदाधिका-यांशी संपर्क साधावा असे आवाहन सर्वस्वी प्रदेशाध्यक्ष बापू कुलकर्णी,महासचिव श्रीनिवास दळवी,विधी सल्लागार विश्वासराव देशपांडे,संपर्क प्रमुख अनुप हल्याळकर,,समविचारी संलग्न शिक्षक कृती विभाग प्रमुख भाग्यश्री रेवडेकर,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभुदास अजगांवकर आदींनी केले आहे.रत्नागिरीत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना या विषयाचे निवेदन देण्यात आले आहे. शिक्षकांनी तक्रारी नोंदवाव्यात असे म्हटले आहे.

*दखल न्यूज भारत*