महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने रावेत मध्ये मोफत कोविड १९ तपासणी घेण्याचे आयुक्तांना निवेदन, प्रविण माळी अध्यक्ष चिंचवड विधानसभा उपविभाग.

244

अतुल पवळे पुणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी.
सध्या कोरोनाचा कहर हा पुणे शहरात वाढतच चालला आहे. त्याचबरोबर आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील ह्याचा प्रभाव वाढत चालला आहे. ह्याच पाश्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ शिंदे वस्ती, रावेत, रावेत प्राधिकरण सेक्टर २९ मध्ये ह्याचा प्रभाव वाढू नये, यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे चिंचवड विधानसभेचे उपविभाग अध्यक्ष प्रविण माळी यांनी कृष्णा डायनाॅस्टिक ची बस पालिकेच्या माध्यमातून मोफत कोविड १९ तपासणी शिबीर घेण्यात यावे. शिबिरामुळे प्रभागातील वाढता कोरोनाचा प्रभाव थांबवण्यात काही प्रमाणात यश नक्की येईल हे नक्की तरी वरील सर्व बाबी लक्षात घेऊन, ही तपासणी लवकरात लवकर राबवावी जेणेकरून गरजूंना त्याचा फायदा होईल यासाठी प्रविण माळी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकीय आयुक्तांना निवेदन दिले.