जिल्ह्यात शिवसेना येत्या काळात एक मजबूत पक्ष संघटन म्हणून उभा राहणार. जिल्हाप्रमुख मा. राजगोपाल भाऊ सुल्वावार चामोर्शी तालुक्यात कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट.

199

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

शिवसेना जिल्हा प्रमुख, मा. राजगोपाल भाऊ सुल्वावार साहेब गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात सदिच्छा भेट दिली. जिल्ह्यात शिवसेना येत्या काळात एक मजबूत पक्ष संघटन म्हणून उभा राहणार. तालुका प्रमुख मा. अमित यासल्वार याच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी चर्चा करतांना ते बोलत होते तसेच पक्ष संघटन वाढवण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना ग्रामीण तालुका प्रमुख, पप्पी पठाण भाऊ प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पूर्ण 12 तालुक्याच्या तालुका प्रमुख यांच्याशी संपर्क साधून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले असून शिवसेना पदाधिकारी जिल्ह्यात पक्ष संघटनाचे काम चांगले करीत असल्याचे यावेळी जिल्हा प्रमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जिल्ह्यात शिवसेना येत्या काळात एक मजबूत पक्ष संघटन म्हणून उभी राहणार आणि जिल्हा परिषद, विधानसभा, ग्राम पंचायत, असे ईतर निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरु असल्याचे बोलत होते.