आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांनतर टाळेबंदी उठली उद्या पासून 9 ते 5 सुरु राहणार सर्व आस्थापने, व्यावसायीकांनी मानले आ. जोरगेवार यांचे आभार

176

 

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता 17 जुलै पासून लाॅकडाऊन करण्यात आले होते. मात्र या लाॅकडाऊनमूळे व्यावसायीकांसह नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. हि बाब लक्षात घेता लाॅकडाऊन उठविण्यात यावे अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कूणाल खेमणार यांना केल्या होत्या. त्यानंतर 26 जुलै पर्यत्न राहणार असलेले लाॅकडाऊन दोन दिवसापर्वीच हटविण्यात आले आहे. त्यामूळे उदया शणिवार पासून शहरातील सर्व आस्थापणे सकाळी 9 ते सांयकाळी 5 पर्यंत सुरु राहतील. नियोजीत वेळेच्या दोन दिवसांपूर्वीच लाॅकडाऊन उठविण्यात आल्याने व्यावसायीकांनीही आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार माणले आहे.

चंद्रपूरात अचाणक कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ झाली. परिस्थितीचे गांर्भिय लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने 17 जुलै ते 26 जुलै पर्यंत लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणामही दिसून आला. आता जवळपास परिस्थीती नियंत्रणात आली आहे. मात्र या लाॅकडाऊनमूळे शहरातील छोटे – मोठे व्यवसाय चांगलेच प्रभावित झाले. तसेच या काळात नागरिकांचीही चांगलीच गैरसोय झाली. त्यामूळे हे लाॅकडाऊन उठविण्यात यावे अशी मागणी होऊ लागली होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेत. आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांची भेट घेत सदर लाॅकडाऊन उठविण्यात यावे अशा सुचना केल्या होत्या. त्यानंतर नियोजीत वेळेच्या दोन दिवसांअगोदरच हे लाॅकडाऊन उठविण्यात आले आहे. त्यामूळे व्यावसायीकांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहे. लाॅकडाउन उठविण्यात आल्याने आता उदया पासून शहरातील सर्व आस्थापने सकाळी 9 ते सांयकाळी 5 वाजेपर्यत सुरु राहणार आहे. असे असले तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सर्तक राहत प्रशासनाने आखून दिलेले सर्व नियम पाळण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.